Nashik Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात नेत्यांनी गाफील न राहता विरोधकांना धोबीपछाड देण्याची रणनीती आखली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्करराव भगरे विजयी झाले. त्यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 80 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. असे असले तरी पक्षाचे नेते मात्र अधिक सावधपणे वाटचाल करताना दिसत आहेत.
भगरेंना 80 मताधिक्य मिळूनही पक्षाचे नेते समाधानी नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना हुरळून न जाता विधानसभा निवडणुकीची तयारी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. ज्या बूथवर कमी मते मिळाली, त्याचा आढावा घेण्यात यावा. त्याची कारणे शोधून उपाययोजना करावी, अशा सूचना देण्यात आले आहेत.
त्यामुळे ज्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला NCP Sharad Pawar कमी मतदान झाले तेथील पक्षाचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची आता झोप उडाली आहे. विशेषत: ज्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी मागणी नोंदविली आहे. त्यांना या निर्णयामुळे कमी मतदान झाल्याची कारणे शोधण्यात व्यस्त व्हावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार दिंडोरी विधानसभा मतदारसंघात 80 हजार मतांनी मागे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना एक लाख 38 हजार 189 मते मिळाली होती. अन्य बाबू भगरे या नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला 27 हजार 442 मध्ये होती.
विधानसभा निवडणुकीच्या 2009 मधील निकालापासून बोध घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अधिक सावध झाले आहे. येत्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीतील नेत्यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे Shriram Shete याबाबत अधिक गंभीर आहेत. त्याला कारणेही तसेच आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघात 55,881 मतांची आघाडी होती.
भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण 2009 मध्ये विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे धनराज महाले 149 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे नरहरी जिरवाड यांची 35 हजार मतांची आघाडी शून्यावर आली होती. त्यामुळे पक्ष यंदा अधिक सावध झाला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.