President's Police Medal Sarkarnama
पुणे

President's Police Medal: राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ठरले राष्ट्रपतींच्या विशिष्टपूर्ण सेवा पदकाचे मानकरी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पोलीस पदके जाहीर केली जातात. उत्तरप्रदेश या राज्याने एकूण 954 पैकी सर्वाधिक म्हणजे 89 पदके मिळवित त्यात बाजी मारली. 76 पदके मिळवून महाराष्ट्राने दुसरा नंबर पटकावला आहे. तर, गुजरातला फक्त 20 पदके मिळाली आहेत. स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेल्या या पदकांचे वितरण प्रजासत्ताकदिनी केले जाते.

राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपतींचे वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवा पोलीस पदक अशा चार प्रकारात हे पदक दिले जाते. यावर्षी फक्त 'सीआरपीएफ'मधील एकालाच राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सेवापदके 82 जणांना देण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील तिघे आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा या तिघांत समावेश आहे. महाराष्ट्रातील 33 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'शौर्य पदक', तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झाले आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा समावेश आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT