Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !

Farmers Andolan On Nagpur RingRoad: अनेक गंभीर चुका केल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना 23 वर्षांपासून भोगावा लागत आहे.
Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !
Published on
Updated on

Nagpur Outer Ring Road News : भूमी अभिलेख कार्यालयांत काय कारभार चालतात, हे सामान्य लोकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. सर्वाधिक बोगस कामे करणारे कार्यालय म्हणूनही हे कार्यालय कुप्रसिद्ध आहे. नागपूर आऊटर रिंग रोडच्या संदर्भातही या कार्यालयाकडून मोठी फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (It has been revealed that the map was made by swapping)

भूमी अभिलेख कार्यालयाकडून फेटरी येथील शेतजमिनींची 10 नोव्हेंबर 2000 रोजी संयुक्त मोजणी करून त्याला मोजणी मामला क्र. 422/97 असे कार्यालयीन टिपणीत संबोधण्यात आले. या मोजणीत भूकरमापकाने अनेक गंभीर चुका केल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना 23 वर्षांपासून भोगावा लागत आहे. कित्येक वर्षापासून तलाठी रेकॉर्डच्या नकाशात दर्शविल्या जात असलेल्या खसरा क्रमांकांच्या भौगोलिक स्थानामध्ये अदलाबदल करून नकाशा बनविल्याचे उघडकीस आले आहे.

ख. क्र. 43/1 च्या शेतमालकाने सर्व दस्तऐवज जोडून रीतसर अर्ज केल्यावर मोजणीअंती त्याला चुकीची ‘क’ प्रत देण्यात आली. कित्येक वर्षापासून आपल्या वहिवाटीत आणि महसुली नोंदीत ख. क्र. 43/1 असलेल्या जमिनीला ख. क्र. 43/2 दर्शविल्याने संतप्त शेतकऱ्याने आता माहितीचा अधिकार अधिनियमाचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे, उपरोक्त ‘क’ प्रतच्या टीप क्र. 2 मध्ये “सदर प्रकरणात मो.मा.क्र.422/97 चा आधार घेण्यात आला“ असे नमूद आहे.

त्यानंतर या शेतकऱ्याने चालानद्वारे पैसे भरुन अन्य कागदपत्रांसोबत मो.मा.क्र.422/97 ची ‘ब‘ प्रत मागितली असता, ती उपलब्ध नसल्याचे खोटे सांगण्यात आले. आपल्या कर्मचाऱ्यांचे पाप लपविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने हा दुटप्पीपणा अंगीकारल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे.

Nagpur RingRoad News: रिंगरोडसाठी नकाशात भौगोलिक स्थानबदल करून फसवल्याचा आरोप, शेतकरी करणार आंदोलन !
Nagpur District News : चार मिनिटांत संपविल्या मुलाखती, अन् बाहेरगावच्यांना पोलिस पाटील म्हणून निवडले !

नागपूरच्या बाह्य वळण मार्गासाठी (आऊटर रिंगरोड) शहरानजीकच्या फेटरीसह तालुक्यातील शेकडो शेतजमिनी अधिग्रहित केल्या. त्याच्या तब्बल २५ वर्षानंतरही प्रशासन उर्वरित जमिनीचा सात-बारा आणि कमी-जास्त पत्रक (कजाप) देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जिल्हाधिकारी, (Collector) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), भूमी अभिलेख नागपूर (Nagpur) (ग्रामीण) आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या चारही कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी टोलवाटोलवी करीत असल्याने त्यांनी आपला फुटबॉल बनविल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये (Farmers) निर्माण झाली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com