Pune Drugs Case sarkarnama
पुणे

Video Pune Drugs Case : ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिस 'अ‍ॅक्शन मोड'वर, हाॅटेल मालकासह पाच जण ताब्यात

Pune Police Drugs Case : लिक्विड लीजर लाउंज हाॅटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाली होती. या व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात दर महिन्याला नवनवीन ड्रग्ज रॅकेटचे प्रकार समोर येत आहेत. तरुणाई या ड्रग्जच्या आहारी गेली असून पुण्यातील हॉटेल्स मध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील एफ सी कॉलेज रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची तातडीने पोलिसांनी दखल घेऊन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ड्रग्ज पार्टी झालेले हॉटेल देखील सील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लिक्विड लीजर लाउंज हाॅटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत होते.

तरुण ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत दाखल झाले होते. तसेच पुणे पोलिसांच्या Pune Police गुन्हे शाखेचे पोलिस सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल झाले होते.

या हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.पुणे पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण ड्रग्ज पार्टीचा सखोल तपास केला जात आहे.

लिक्विड लीजर लाउंज हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी केले जप्त केले असल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी Police मॅनेजरसोबत या ठिकाणी काम करत असलेल्या एक कर्मचाऱ्याला ताब्यात घेत चौकशी केली.

हाॅटेलचा मालक ताब्यात

पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या पाच जणांमध्ये लिक्विड लीजर हाॅटेलचा मालकसुद्धा ताब्यात आहे.तसेच हॉटेलचे ३ पार्टनर सुद्धा ताब्यात आहेत. संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT