Parbhani Congress News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल बुधवंत यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा प्रचार केल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव यांनी त्यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली होती.
मात्र बुधवंत यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे सांगत काँग्रेसने या प्रकरणातून हात झटकले आहेत. खासदार जाधव यांनी केलेल्या तक्रारीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वडपूरकर यांनी खुलासा केला आहे.
लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी महायुतीचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव केला. मात्र महाविकास आघाडी असतांना काँग्रेसचे (Congress) स्थानिक नेते विशाल बुधवंत यांनी महायुतीच्या महादेव जानकर यांचे काम केल्याची तक्रार खासदार जाधव यांनी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण तापले होते. यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांनी मात्र, विशाल बुधवंत यांच्या भूमिकेशी पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. खासदार संजय जाधव काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक मराठाविरूध्द ओबीसी, या वादामुळे चांगलीच गाजली. निवडणुकीत जातीय रंग भरला गेल्याने विकासाचे मुद्दे बाजूला राहिले. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (Shiv Sena) उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांच्या प्रचारासाठी मित्रपक्ष असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कामे केली. परंतु या प्रचारात काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल बुधवंत यांनी जाहिरपणे महायुतीचे महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार केला. यावरून मोठी चर्चा देखील झाली.
आता विशाल बुधवंत यांच्या भूमिकेवरुन काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी हात वर केले आहेत. विशाल बुधवंत यांच्या भुमिकेचा आणि परभणी जिल्हा काँग्रेस कमीटीचा कुठलाही संबध नाही. विशाल बुधवंत काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा प्रचार करण्याऐवजी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. विशाल बुधवंत यांना वारंवार सूचना व समजाऊन सांगुनही त्यांनी काँगेस पक्षाच्या विरोधात भुमिका घेतली. तशी सूचना व तक्रार देखील पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. तेव्हापासून विशाल बुधवंत यांच्या भूमिकेशी व त्यांच्या विचारांशी, काँग्रेस पक्षाचा व वैयक्तिक माझा कसलाही संबध नसल्याचे वरपूडकर यांनी खुलाशात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.