Pune Flex Removed sarkarnama
पुणे

पुण्यातील राजकीय तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी उचलले पाऊल...

महापालिकेने Mahapalika मोजणी केल्यानंतर त्यामध्ये 1400 अनधिकृत फ्लेक्‍स 1400 Unauthorized Flexus असल्याचे आढळून आले असून ते शनिवारी Saturday दिवसभरात हटविले.

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार तणावात असून शुक्रवारपासून पुण्यासह विविध ठिकाणी बंडखोर आमदारांचे फ्लेक्‍स, होर्डींग फाडण्यापासून त्यांची कार्यालये फोडण्याचे प्रकार सुरु झाले. दरम्यान, बेकायदा फ्लेक्‍स, होर्डींग हटविण्याच्या प्रकारातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचनेनुसार पुणे पोलिसांच्या मदतीने महापालिकेकडून शहरातील राजकीय व अन्य सर्व प्रकारचे अनधिकृत बॅनर, फ्लेक्‍स, होर्डींग हटविण्यास सुरुवात झाली.

महापालिकेने मोजणी केल्यानंतर त्यामध्ये 1400 अनधिकृत फ्लेक्‍स असल्याचे आढळून आले असून ते शनिवारी दिवसभरात हटविले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासमवेत घेऊन बंड पुकारल्यानंतर महाआघाडी सरकार मागील काही दिवसांपासून तणावामध्ये आहे. या सगळ्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

या घटनेची गांभीर्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी तत्काळ शनिवारी शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींगची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये 1400 हून अधिक फ्लेक्‍स आढळले. त्यानुसार, संबंधित फ्लेक्‍स तत्काळ काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवातही केली.

दरम्यान, राजकीय व्यक्तींचे फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग फाडणे, काढण्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने हि कारवाई केली जात असल्याची सद्यस्थिती आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडूनही राजकीय व अन्य सगळ्या स्वरुपाचे फ्लेक्‍स काढले जात आहे. दरम्यान, पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या मदतीने अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर, होर्डींग काढले जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात कोणत्याही स्वरुपाचे अनधिकृत फ्लेक्‍, बॅनर, होर्डींग आढळून आल्यास तत्काळ पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला (क्रमांक - 112) माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT