Pune Congress Bhavan Dispute :
Pune Congress Bhavan Dispute :  Sarkarnama
पुणे

Pune Congress Bhavan Dispute : 'काँग्रेस भवन'वरून वाद चिघळला; मुळीकांची भेट घेऊन, पुस्तिका देणार भेट..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या काँग्रेस भवन या वास्तूवरून आता पुण्यात राजकारण तापलेले आहे. पुण्याच्या काँग्रेस भवनचा उल्लेख पुणे भाजपच्या सोशल मीडियाच्या अधिकृत हँडववरून 'राजवाडा' असा उल्लेख केला गेला होता. ही टीका आता काँग्रेसला जिव्हारी लागली असून, या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. (Latest Marathi News)

पुणे भारतीय जनता पक्षाने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐतिहासिक काँग्रेस भवन या वास्तूची काल बदनामी केली, असे पुणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावरून आता पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ व पदाधिकारी भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन, त्यांना काँग्रेस भवन या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व सांगणारी पुस्तिका भेट देण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक महत्वाच्या घटना आणि आंदोलनांचे पुण्यातील काँग्रेस भवन ही वास्तू साक्षीदार आहे. आजच्या पक्षीय राजकारणातून भाजपा पुणे या वास्तूविषयी चुकीची माहिती जनतेमध्ये पसरवत आहे.

देशभक्त केशवराव जेधे, देशभक्त शंकरराव मोरे, देशभक्त काकासाहेब गाडगीळ यांनी केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेसाठी या वास्तूची निर्मिती लोकवर्गणी आणि स्वतः जवळील पैसा खर्च करून ही इमारत उभी केली. पुणेकरांचा मानबिंदू असलेल्या मोजक्या इमारती पैकी ही महत्वाची वास्तू आहे, असे राहुल शिरसाठ म्हणाले.

महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या या ऐतिहासिक काँग्रेस भवनच्या निर्मितीचा इतिहास आणि या इमारतीबाबत लोकसेवेचा वारसा सांगण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची भेट घेणारं आहोत.

यावेळी त्यांना हा संपूर्ण इतिहास शब्दबद्ध केलेल्या पुस्तिकाही भेट देणारं आहोत, असे पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी म्हंटले आहे. युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, तसेच काँग्रेस नेते यांनी आज दि. १ जून रोजी भाजप कार्यालयामोर निदर्शने करण्याचा यामुळे दिवसभर काँग्रेस भवन या वास्तूवरून शहरातील राजकीय वातावरण चर्चेत राहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT