IAS Pooja Khedkar Update : मागील काही दिवसांपासून चर्चा आणि नवनवीन आरोपांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचं चौथं चौथं दिव्यांगं प्रमाणपत्र 'साम' टीव्हीच्या समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजा यांनी चौथं दिव्यांग प्रमाणपत्र काढलं होतं.
पुण्यातील औंध येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून पूजा खेडकर(Pooja Khedkar) यांना दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं गेलं होतं. मात्र त्यानंतर 24 ऑगस्ट 2022 रोजी रोजी पूजा यांनी पिंपरी येथील पालिकेच्या रुग्णालयातून हे प्रमाणपत्र मिळवलं.
यावर पूजा खेडेकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, माझ्यावर जे काही आरोप लावण्यात आले आहेत. त्यावरून कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल, त्यावर मी पूर्ण स्पष्टीकरण देईल. त्यानंतर कमिटी जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून ही अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डावा गुडघा सात टक्के कायमस्वरूपी अधु असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं.
एवढच नाहीतर अपंगत्वाचा प्रमाण प्रमाणपत्र घेण्यासाठी पूजा खेडेकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेशन कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल सुद्धा सादर केले होते, असं वायसीएम रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. या आधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्राचा प्रकारही समोर आलेला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.