Pune News: पुण्यातील कल्याणी नगर येथे घडलेले पोर्शे अपघात प्रकरणाची देशभरात चर्चा झाली. अल्पवयीन कारचालक आणि त्याच्या कुटुंबाचे कारनामे संपूर्ण देशाने पाहिले. या प्रकरणावर ती कुठेतर काळाचा पडदा पडत असून उडालेली टीकेची धूळ खाली बसत असतानाच अगरवाल कुटुंबाने लाडक्या बाळासाठी कोर्टाकडे पासपोर्ट परत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या अल्पवयीन आरोपीचे परदेशात निघून जाण्याचा तर डाव नाहीये ना ? अशा चर्चा सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी कल्याणी नगर परिसरामध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होत. एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्यंत त्रोटक अशी शिक्षा देऊन अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आल्यानंतर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळाला. यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत तपासाला वेग देऊन या प्रकरणांमध्ये अटक सत्र राबवलं.
यानंतर या प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपावरून ससूनमधील दोन डॉक्टर देखील अटकेत आहेत. बालहक्क संरक्षण कायद्यांच्या नियमामुळे अल्पवयीन आरोपी तुरुंगातून सुटला होता. मात्र, त्याचे आई-वडील अध्यापन तुरुंगातच असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
आता अगरवाल कुटुंबीयांनी बालहक्क न्याय मंडळाकडे अर्जाद्वारे एक मागणी केली आहे. यामध्ये अग्रवाल कुटुंबीयांनी अल्पवयीन आरोपीचा पासपोर्ट परत द्यावा, अशी मागणी केली आहे . यापूर्वी अगरवाल कुटुंबीयांनी ज्या आलिशान पोर्श कारची धडक बसून अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता, ती पोर्शे कार परत करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे.
याबाबत बालहक्क न्यायमंडळाकडे बुधवारी सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पासपोर्ट परत करणे आणि आलिशान कार अगरवाल कुटुंबाच्या हवाली करण्याबाबत बालहक्क न्यायमंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.