Porsche Update three employees suspended  Sarkarnama
पुणे

Porsche Hit And Run Case Update : पुणे 'कार'नामा.. मोठी अपडेट; रक्तांचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह 'ससून'मधील तिघांचे निलंबन

Pune Accident Porsche : चौकशी समितीने मंगळवारी ससून रुग्णालयात दाखल होत दिवसभर विविध मुद्द्यांच्या आधारे चौकशी केली असून त्या चौकशीच्या आधारावरती अहवाल तयार करून तो राज्य शासनाला सुपूर्त केला..

Sudesh Mitkar

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून या अहवालाच्या आधारे आता कारवाई करण्यात आली आहे.

कल्याणीनगर अपघात (Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे तपासणीसाठी दिलेले रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) ससून हॉस्पिटलमध्ये थेट बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी तीन लाख रूपये घेत हा उद्योग केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता त्रिसदस्य समिती नेमली आहे. जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ.पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या चौकशी समितीने मंगळवारी ससून रुग्णालयात दाखल होत दिवसभर विविध मुद्द्यांच्या आधारे चौकशी केली असून त्या चौकशीच्या आधारावरती अहवाल तयार करून तो राज्य शासनाला (State Goverment) सुपूर्त केला होता. दरम्यान त्यानंतर आता तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयात काम करणारे डॉ. तावरे तसेच अपघातग्रस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि अतुल घाटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात

डॉ. पल्लवी सापळे अधिकारी वादग्रस्त राहिल्या आहेत . त्या कारकिर्दीमध्ये अनेकदा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती झाले आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात देखील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनीच हा आरोप केले आहेत. त्यामुळे चौकशी समितीचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली असून या समितीवर तीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT