Pune Political News : 'देशात भाजपाच्या सरकारने मोठ्या प्रमाणात लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत केंद्रात आरएसएस आणि भाजपाचे सरकार केंद्रामध्ये येणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. यासाठी फुले, शाहू, आंबेडकर विचाराच्या मतदारांनी जे मतदार कोणत्याच विचारांचे नाही असे प्रत्येकी पाच मतदार जोडले पाहिजे.' अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 'सत्ता परिवर्तन महासभा' आयोजित करण्यात आली होती. 'एसएसपीएमएस'च्या मैदानावर ही सभा झाली. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या महासभेत प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंबेडकर म्हणाले, 'मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. या निवडणुकीत केंद्रात भाजपाची सत्ता येणार नाही याचे ' लक्ष्य ' आपण कायम ठेवलं पाहिजे. यासाठी आवश्यक ती दक्षता आपण घेतली पाहिजे. निवडणुकीच्या अगोदर दंगली घडतील. अनेक घटना घडतील. राज्यकर्ते जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतील, मात्र आपण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे. मतदाराने दाखवण्याची गरज आहे, की या देशाचा राजा मतदार आहे आणि तोच ठरवेल या सत्तेवर कोण बसणार.' असे आंबेडकर म्हणाले.
याशिवाय आघाडी होईल ना होईल हे सांगता येत नाही. आपली इच्छा आहे आघाडी झाली पाहिजे. मात्र मोदी(PM Modi) ' रिंगमास्टर ' आहेत. आमचा ऐकलं नाही तर जेलमध्ये टाकतो असं ते म्हणतात. मग इतर लोक जेलमध्ये जाण्यापेक्षा तुमच्या जेलमध्ये येतो असे म्हणून भाजपामध्ये प्रवेश करतात, अशी टीका देखील आंबेडकर यांनी केली.
ज्या सरकारने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा अधिकाधिक अवलंब केला आहे. नव्याने वेठबिगार पद्धत आणण्याचा डाव या सरकारने आणला आहे. नोकरीचे शाश्वती नाही हमी नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी यावेळी केली.
भाजपला(BJP) सत्तेपासून दूर करायचा असेल तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाला वंचित विकास आघाडीला सत्तेत मोठ्या प्रमाणात वाटा दिला पाहिजे, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.