Sanjay More News : '...अन्यथा मराठा समाज 'त्या' नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही' ; संजय मोरेंचं विधान!

Maratha Reservation News : 'फडणवीस यांच्या 'गुडबुक' मध्ये जाण्यासाठी भाजपाचे काही नेते...' असंही संजय मोरे म्हणाले आहेत.
Sanjay More
Sanjay MoreSarkarnama

Pune News : 'मनोज जरांगे यांनी सत्य मांडण्यास सुरुवात केल्याने आता हे सत्ताधाऱ्यांना पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही स्वयंभू नेते मीडियामध्ये येऊन मनोज जरांगे यांची बदनामी तसेच आंदोलनावर टीका करण्याचे काम करू लागले आहेत.' अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केली आहे.

संजय मोरे(Sanjay More) म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन, उपोषण केले. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे - फडणवीस सरकारमधील अनेक नेत्यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली. सकाळ, संध्याकाळ राज्य सरकारमधील प्रतिनिधी आंदोलनाबाबत त्यांची भेट घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी जरांगे यांना विनंती करत होते.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay More
Maval NCP News : निवडणूक जवळ आली रुसव्या फुगव्याची वेळ झाली; मावळमध्ये राष्ट्रवादीत रंगले राजीनामा नाट्य

याशिवाय 'आरक्षणासाठी मुंबई पर्यंत मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत राज्य सरकारने आरक्षण देण्याचे मान्य केले. जरांगे यांच्या मागण्या केल्या जातील असे आश्वासन देत त्यांच्या मोर्चाचे जाहीरपणे कौतुक केले. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे मान्य केल्यानंतर मराठा समाजाने राज्यात सत्ताधारी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन देखील केले होते.

मात्र राज्य सरकारने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा समाज आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी आता राज्य सरकारवर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसा दगा दिला हे बोलण्यास सुरुवात केली आहे.' असंही मोरे म्हणाले.

याबरोबरच 'उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadnavis) हे ईडी, सीबीआय मार्फत पक्ष फोडतात. त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडले. तसेच त्यांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडला, तसाच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला हे सर्वजण सांगत आहेत. यामुळे फडणवीस यांच्या 'गुडबुक' मध्ये जाण्यासाठी भाजपाचे काही नेते फडणवीस यांचे मराठा समाजावर कसे मोठे उपकार आहेत याबद्दल वक्तव्य करत आहेत.

फडणवीस यांना खुश करण्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य देखील करत आहेत. या नेत्यांनी आपल्या वक्तव्यावर भान ठेवावे, अन्यथा मराठा समाज व महाराष्ट्रातील जनता अशा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, याची जाणीव ठेवावी.' असा इशारा मोरे यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sanjay More
Pune Congress News : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com