Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar :''मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी मशिदीत...'' ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Prakash Ambedkar on RSS : ''धार्मिक तेढ निर्माण करणारे गुजरात मॉडेल आरएसएसला महाराष्ट्रात राबवायचे आहे.'' असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Sudesh Mitkar

Prakash Ambedkaron mosque blast News : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करायला आले आहेत, असे वाटते. पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी धार्मिक तेढ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बीडमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एका मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, यात दोन आरोपींना पकडले गेले.'' असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान त्यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू असताना दुसरीकडे बीडमध्ये एका प्रार्थनास्थळावर स्फोटाचा प्रकार घडला. या घटनेच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) म्हणाले, ''एकीकडे बीडमध्ये प्रार्थना स्थळांमध्ये जिलेटिनचा स्फोट घडून आणण्यात आला तर दुसऱ्या बाजूला, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंहचा मालेगाव येथे आज जाहीर सत्कार करून 'हिंदूवीर' पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.''

तसेच, ''याच कार्यक्रमात कोरेगाव भीमा हल्ल्यातील आरोपी असलेले मिलिंद एकबोटे देखील असणार आहे. हा सगळा घटनाक्रम पाहता आरएसएसचा गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा डाव आहे.'' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर() यांनी केली आहे. या संदर्भातील भूमिका त्यांनी एक्स प्लॅटफॉर्म वर मांडली आहे.

''धार्मिक तेढ निर्माण करणारे गुजरात मॉडेल आरएसएसला महाराष्ट्रात राबवायचे आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा कार्यक्रमांमधून प्रशिक्षित करण्याचा आरएसएसचा उद्देश आहे.'' असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले बीड आणि मालेगाव या दोन्ही घटना धार्मिक, जातीय तेढ वाढवून आपला राजकीय डाव साधणाऱ्या आहेत. यावर काँग्रेस नेहमीप्रमाणे गप्प आहे! फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या विरोधात लढत आहे. महाराष्ट्राला धार्मिक तेढ आणि जातीयवादाचे केंद्र होऊ देणार नाही. या विरोधात आम्ही लढत राहू! आपले कोण? परके कोण? हे ओळखा!, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT