
Governor Haribhau Bagade latest : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ते हेलिकॉप्टर अपघातमधून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली आहे. शिवाय, या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
ज्यामध्ये दिसत आहे की, राज्यपाल बागडे ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवासाला निघाले होते, त्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच त्यातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच हेलिकॉप्टर तत्काळ खाली उतरवले गेले आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आढळून आल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यपाल बागडे पालीच्या दौऱ्यावर होते आणि ते पाली येथून जयपूरकडे रवाना होत होते. ज्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, तेवढ्यात हेलिकॉप्टरमधून धूर निघू लागला. पायलटच्या ही बाब तत्काळ लक्षात आली आणि त्याने दुसऱ्याच मिनिटाला हेलिकॉप्टर खाली उतरवले.
राज्यपाल बागडे यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर का निघू लागला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अशावेळी असं म्हटलं जात आहे की राज्यपाल बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाऊ शकतो. मात्र या घटनेमुळे राज्यपालांच्या सुरक्षेवर आणि हेलिकॉप्टरच्या स्थितीवरही प्रश्न निर्माण केले आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल हरिभाऊ बागडे सुरक्षित आहेत आणि या घटनेदरम्यान त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. राज्यपालांचे सुरक्षा पथक आणि आपत्कालीन प्रतिक्रिया दलाने घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली आली आणि राज्यपाल बागडे यांची सुरक्षा सुनिश्चित केली.
तर हेलिकॉप्टरमधून धूर निघण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे आणि या घटनेची चौकशी केली जात आहे. या दरम्यान हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी केली जाणार असून, सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेले आहे की नाही हेही पाहिले जाणार आहेत. या घटनेसाठी कोणताही बेजबाबदारपणा तर कारणीभूत नाही ना, हेही पाहिले जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी अधिकारी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.