Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar MVA Politics : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ' नेत्यांना 'हा' थेट सवाल

सरकारनामा ब्यूरो

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांचं (Prakash Ambedkar) स्थान काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण अजूनही वंचित बहुजन आघाडीला ना महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळालं आहे, ना 'इंडिया' आघाडीमध्ये (INDIA Alliance) . त्यामुळे उद्या दिल्लीत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार काय, असा मोठा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. त्यावर आंबेडकरांनीच आता उत्तर दिलं आहे.

भाजपविरोधात लढण्यासाठी 'इंडिया' आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यात देशातील 28 पक्ष एकत्र आले आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) अजून 'इंडिया' आघा़डीचं 'गेट' उघडलेलं नाही. 'वंचित' आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात युती झाली असली तर महाविकास आघाडीत 'वंचित'ला स्थान मिळणार काय, याचं उत्तर अजूनही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर उद्या 'मविआ'ची दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीचं निमंत्रण नाही, असं थेट उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे

एवढंच नाही तर 'मविआ'च्या या धरसोड वृत्तीवर प्रकाश आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल केला आहे. 'आजपर्यंत महाराष्ट्रातील जागावाटप का केलं नाही, यांचं उत्तर जनतेला देऊन त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट कराव्यात' असं आव्हान आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं आहे.

दिल्लीत महाराष्ट्रातील जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे हे मला वर्तमानपत्रातून कळलं. या बैठकीचं आमंत्रण अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही, असं आंबेडकरांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' आघाडीची मोट बांधली आहे. पण यात भाजपवर कायम तोंडसुख घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळालेले नाही. आपल्याला महाविकास आघाडीत तसेच 'इंडिया' आघाडीत सामावून घ्यावे, ही प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतूनही त्यांना सकारात्मक संकेत मिळत आहेत. प्रत्यक्षात थेट उत्तर मिळत नसल्याने प्रकाश आंबेडकर दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत.

'वंचित'च्या कक्षा रुंदावल्या...

दरम्यान, अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीने लढवावी, अशी भूमिका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केली. त्यावर केवळ अकोलाच नाही तर पुण्यातूनही मी लढू शकतो, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT