Prakash Javadekar|
Prakash Javadekar| 
पुणे

प्रकाश जावडेकरांनी सांगितला फरक; 'राजीव गांधींच्या काळात....'

सरकारनामा ब्युरो

latest political news in Pune

पिंपरी : राज्यांत सध्या जी आघाडी आहे, ती अनैसर्गिक आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत. वसूली आणि सर्व केसेस संपविणे व दाबणे, हाच या आघाडीचा किमान एक कलमी संयुक्त कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर सोमवारी (ता.६) लोणावळा येथे केला. शिवसेनेने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि नंतर सत्तेसाठी त्यांनी मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली,अशी तोफ त्यांनी डागली.राज्य सभेची सहावी जागा भाजपच (BJP जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजीव गांधी पंतप्रधान असताना शंभर रुपयांपैकी केवळ १५ रुपयेच लाभधारकाच्या हातात पडायचे, अशी विदारक स्थिती होती. आता मोदी पंतप्रधान असताना ते शंभरच्या शंभर रुपये पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत आहेत. अशाप्रकारे गेल्या तीन वर्षांत विविध योजनांचे २१ लाख कोटी रुपये लाभधारकांच्या खात्यावर जमा झाले आहेत. हे सर्वात मोठे केंद्र सरकारचे काम व यश आहे. मोदी व केंद्र सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे जगात देशाची प्रतिष्ठा व सन्मान वाढला आहे,असा दावाही जावडेकरांनी यावेळी केला. भाजपच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बुथ सशक्तीकरण मेळाव्यात ते बोलत होते.माजी

माजी राज्यमंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस अॅड मोरेश्वर शेडगे आदी यावेळी उपस्थित होते.मोदींनी आणलेल्या प्रभावी योजनांमुळे देशातील जनता आत्मसन्मानाने जगत असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे ती समाधानी आहे,असा दावाही जावडेकरांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT