Rajya Sbha Election : दोन मतांसाठी शिवसेना एमआयएमपुढे झुकणार ?

शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार विजयी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांची महाविकास आघाडीला मदत लागणार आहे. यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. (Aimim)
CM Uddhav Thackeray News, Asaduudin Owaisi News, Rajya Sbha Election 2022 News Updates
CM Uddhav Thackeray News, Asaduudin Owaisi News, Rajya Sbha Election 2022 News UpdatesSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्या पासून ते औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांच्या सोबत कधीच जाणार नाही, अशी डरकाळी फोडणारी शिवसेना (Shivsena) सध्या राज्यसभेतील दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी मतांची जुळवाजुळव करत आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asduudin Owaisi) यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा मागितला तर आमदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. (Rajya Sbha Election 2022 News Updates)

भाजपच्या उमेदवाराचा पराभव व्हावा, असे जर महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी पाठिंब्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही ओवेसी यांनी केले आहे. आतापर्यंत एमआयएमला (Aimim) टोकाचा विरोध करणारी, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकवला म्हणून दुषणे देणारी शिवसेना राज्यसभेत दुसरा उमेदवार निवडून यावा म्हणून दोन मतांसाठी एमआयएमपुढे झुकणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या सहा जागंसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना २, भाजप, ३, आणि राष्ट्रवादी, काॅंग्रेसचे प्रत्येकी १ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले, परंतु भाजपने तिसरा उमेदवार देत निवडणूक लादली. एवढेच नाही तर आमचा तिसरा उमेदवार विजयी होणार असा दावा देखील भाजपकडून केला जात आहे.

शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार विजयी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांची महाविकास आघाडीला मदत लागणार आहे. यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. एमआयएमचे राज्यात दोन आमदार आहेत, ही मतं पाहिजे असतील तर आम्हाला पाठिंबा मागा, असे ट्विट नुकतेच असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

CM Uddhav Thackeray News, Asaduudin Owaisi News, Rajya Sbha Election 2022 News Updates
Rajya Sabha : गिरीश महाजन कोणाला गळाला लावणार, यावर निकाल ठरणार..

भाजपच्या उमेदवाराचा पराभव करावा असे वाटत असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आमदारांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीला मदत करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहे. आता एमआयएमला टोकाचा विरोध करणारी शिवसेना राज्यसभेत दुसरा उमेदवार निवडूण आणण्यासाठी दोन मतांसाठी एमआयएमपुढे झुकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com