Wabalewadi School Case : Sarkarnama
पुणे

Wabalewadi School Case : वारे गुरुजींना प्रकाश महाजनांच्या अशाही शुभेच्छा!

अनुराधा धावडे

Shikrapur Politics : दोन वर्षांपूर्वी झालेले गंभीर आरोप सहन न झाल्याने व्यथित होऊन अनवाणी राहिलेल्या वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील माजी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या पायांच्या वेदना शमविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी भावना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या. याचवेळी त्यांनी त्यांच्या पायाला चंदन लावून पायही धुतले. या शिक्षकांच्या नशिबी असले वाइट दिवस येणे हे राज्याचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

१४ जुलै २०२१ रोजी केवळ तोंडी आरोपांनी प्रकरण सुरू झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने वारे यांचे निलंबन केले होते. महानुभव पंथाचे अनुयायी, शाकाहारी, सात्विक विचारसरणीचे वारे यांना हा प्रकार इतका खटकला की, त्यांनी त्या दिवसापासून अनवाणी राहणे सुरू केले. काहीही संबंध नसताना या प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने त्यांनी अनवाणी राहण्याचा निश्चय केला.

गेल्या दोन वर्षांत त्यांना झालेल्या वेदना शांत व्हाव्यात आणि एका आदर्श शिक्षकाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र असल्याचे सांगण्यासाठीच आपण इथे आल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:सोबत आणलेल्या चंदन, एक परात आणि पाणी यांनी वारेंच्या पायाला चंदन लावले व ते धुऊन एका आदर्श गुरूची सेवा केली. (Wablewadi)

प्रकाश महाजनांचे वडीलही सोबत.. ?

आयुष्यात गुरूंना सर्वोच्च स्थान देण्याचे संस्कार करण्याचे काम आमच्या वडिलांनी केले. ते वडील माझ्यासोबत आहेत, पण सोबत कुणीच दिसत नसताना त्यांनी लगेच त्याचा खुलासाही केला. माझ्या हातात जे घड्याळ आहे ते ८० वर्षांपूर्वीचे घड्याळ असून, ते वडिलांच्या हातातील घड्याळ आजही चालू स्थितीत माझ्या हातात आहे.पर्यायाने माझे वडील या घड्याळाच्या रूपाने सोबत आहेत. दरम्यान, महाजन यांच्या मुलीचा आज वाढदिवस असतानाही ते थेट मराठवाड्यातून खास वारेंच्या पूजेसाठी आल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT