Pune News : चिंचवड विधानसभेसाठी भाजपने यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. जगताप यांच्या प्रचारासाठी वाल्हेकरवाडीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. '
'काँग्रेसने गेल्या 60 वर्षात कामगार वर्गाचा छळ केला तसेच त्यांना विकासाची समान संधी दिली नाही, अशी टीका सावंत यांनी यावेळी केली. 'भाजपचे डबल इंजिन सरकार कामगारांच्या कल्याणासाठी काम करेल,' असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
'कामगार आणि उद्योजक संवाद आणि स्नेह मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने ६० वर्ष कामगारांचा छळ केला, त्यांना विकास प्रवाहात सामिल करुन घेतले नाही. तर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवत असल्याचे', सावंत म्हणाले.
'लेबर कार्डमुळे कामागारांना घर, मुलांसाठी शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा मिळवणे सुलभ झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कामारांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नाचे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी कौतुक केले. तसेच, महायुती(Mahayuti) सरकारने पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यात रस्ते, विमानतळ आणि लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठे काम झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक उद्योग पुण्यातून बाहेर गेले. तर, महायुती सरकारच्या काळात राज्यात पुन्हा उद्योग आणि गुंतवणूक आणण्याचे काम झाले, असे सावंत म्हणाले.
भाजप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारसभेत चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, गोरख धोत्रे, विलास सपकाळ यांच्यासह भाजप महायुते नेते आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.