Chhagan Bhujbal Politics: महायुतीच्या `या` दिग्गज नेत्यावर आज जरांगे पाटील घालणार शेवटचा घाव!

Manoj Jarange Patil; jarange Patil in Yeola today Chhagan Bhujbal may came in trouble- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज येवला विधानसभा मतदार संघात विविध भागांना भेटी देणार आहेत.
Manikrao Shhinde, Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manikrao Shhinde, Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Jarange Vs Bhujbal: राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच जरांगे आज भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन त्या वादाला फोडणी देणार आहे. त्यामुळे येवल्याचे वातावरण आज चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पराभूत करणार असे यापूर्वीच सांगितले होते. निवडणूक जाहीर झाल्यावर मात्र त्यांनी याबाबत थेट भाष्य करणे टाळले होते. त्यांनी भुजबळ यांच्या विषयी भूमिका देखील जाहीर केली नव्हती. या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना आश्वासन दिले नव्हते.

Manikrao Shhinde, Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Vasant Gite Politics: वसंत गीते म्हणतात, येत्या 20 नोव्हेंबरला नाशिक `ड्रग्ज मुक्त` होणार!

येवला मतदार संघातील कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीत जरांगे पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळेल ,अशी अपेक्षा होती. कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आज पूर्ण होत आहे. गेले काही दिवस जरांगे पाटील यांच्या संपर्कात असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर जरांगे पाटील येवल्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे ते काय राजकीय भूमिका मांडतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Manikrao Shhinde, Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Nirmala Gavit Politics: अपक्ष निर्मला गावित यांनी वाढवली हिरामण खोसकर यांची डोकेदुखी?

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. माणिकराव शिंदे यांनी देखील यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी देखील जरांगे पाटील यांच्याकडे पाठींबा मागीतला होता. मात्र जरांगे पाटील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली होती.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा येवला दौरा झाला. यावेळी शरद पवार यांच्या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेत श्री पवार यांनी माझ्याकडून श्री. भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी देऊन चुक झाली. ती तुम्ही दुरूस्त करा. भुजबळ यांना थेट गद्दार असे संबोधले होते. सर्व काही देऊन आणि उपमुख्यमंत्री, मंत्री अशी विविध पदे देऊनही भुजबळ यांनी गद्दारी केली. त्यामुळे त्यांचा पराभव करा, असे थेट आवाहन शरद पवार यांनी केले होते.

येवला मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या चार निवडणुकांत मंत्री भुजबळ शरद पवार यांचेच उमेदवार होते. या पार्श्वभूमीवर प्रचाराला दोन दिवस शिल्लक असताना ही निवडणूक आता भुजबळ यांना अडचणीत आणणारी ठरते की काय, अशी स्थिती आहे. शरद पवार यांनी पेटविलेल्या राजकीय वादात जरांगे पाटील यांचा दौरा आणखी भडका उडवण्याची शक्यता आहे. विशेषतः लासलगाव परिसरातील 42 गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत. याच भागात मनोज जरांगे पाटील आज दौरा करीत आहेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com