Pranay Shinde joins BJO
Pranay Shinde joins BJO sarkarnama
पुणे

पुण्यात तोडफोड जोरात : काॅंग्रेस नेत्याचा पुतण्याच भाजपमध्ये

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची (PMC election) प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता एकमेकांचे नेते फोडण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. आता भाजपने काॅंग्रेस नेत्याचा पुतण्याला प्रवेश देऊन आपल्या परीने सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेविकेचे पती अजय सावंत यांना प्रवेश दिला होता.

महापालिकेतील कॉंग्रेसचे नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांचे पुतणे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) , भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर पाटील म्हणाले की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींजीच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह माननीय मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे. पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार.

दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT