Pune Rave Party Raid Sarkarnama
पुणे

Pune Rave Party: खेवलकरांचे वकील म्हणतात, 'पर्समध्ये ड्रग्ज सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली होती!

Pune Drug Case Pranjal Khewalkar News update: पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

Mangesh Mahale

Pune News: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. ज्या महिलेचा पर्समध्ये हे ड्रग्ज सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा डावा या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर (pranjal khewalkar)यांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. रविवारी खेवलकर यांच्यासह सात जणांना या प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

खेवलकर यांच्या विरोधात खोटी कारवाई केली आहे, याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे ठोंबरे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे हे पोलिस आयुक्तलयात जाणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ते भेट घेणार आहेत.

प्रांजल खेवलकर यांच्यावर चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप खडसे कुटुंबाने केला आहे. मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी प्रांजल खेवलकर यांना दिली आहे.

खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये ही पार्टी सुरू होती. खेवलकरच्या नावे दोन रुम बुक करण्या आल्या होत्या. बुक करण्यात आलेल्या दोन्ही रुमची बिले पोलिसांना मिळाली आहेत. त्यातील १०१ ही रुम एका रात्रीसाठीच बुक करण्यात आली होती. ही रुम कशासाठी बुक केली गेली होती? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

रविवारीही रुम १०२ मध्ये पार्टी होणार होती. तीन रात्रींसाठी ही रुम बुक केली गेली होती. प्रांजल खेवलकर शुक्रवारी रात्री या रुममध्ये मुक्कामी होते,अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली.

पार्टी सुरू असलेल्या रुममध्ये हुक्का पॉट,कोकेन, गांजा,दारु होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांना कोकेनच्या तीन पुड्या तिथे मिळाल्या. पार्टीसाठी कोकेन कुणी आणलं, त्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. खेवलकर यांचे वकीलांनी केलेल्या दाव्यामुळे आता तपासाची दिशा बदलणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT