Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule Vs Ajit Pawar : 'काय चुकलं तिचं? भाऊ फितूर झाला; स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला'

Lok Sabha : शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगतापांची अजितदादांवर सोशल मीडियातून जळजळीत टीका

Sudesh Mitkar

Pune Political News : 'बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून आली. हे पाहताच भावाच्या फितुरीचे दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली. विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन् आपल्या बापाची ढाल झाली. ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय! सांगा... काय चुकलं तिचं?' असा आशयाचा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांवर जळजळीत टीका केली. Prashant Jagtap Attack Ajit Pawar.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता बारामती Baramati लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच प्रशांत जगताप यांनी एक्स आणि फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अजित पवारांना पक्षात पाडलेली फूट आणि त्यानंतरची स्थिती मोजक्या आणि शेलक्या शब्दांत मांडत टीका केली आहे.

प्रशांत जगताप नेमके काय म्हणाले ?

जवळपास 50 वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला. पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रूची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन् अहंकारी... की ज्याला स्वतःला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय.

चुकांवर पांघरून घातलं..

भाऊ शत्रूला जाऊन मिळाला... पण का? तेच कळेना... काय हवं होतं या भावाला? काय द्यायचं बाकी होतं? जिवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं... काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं ?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बापाची ढाल झाली..

आपल्या बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येतेय हे पाहताच भावाच्या फितुरीचं दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली. विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन् आपल्या बापाची ढाल झाली... ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय..! सांगा.... काय चुकलं तिचं ? असा सवाल करत प्रशांत जगतापांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या Supriya Sule संघर्षाकडे लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT