Prashant Jagtap criticized Amit Shah Sarkarnama
पुणे

Prashant Jagtap News : शरद पवारांवरच्या टीकेवरून प्रशांत जगतापांनी लंडनहून येताच अमित शहांवर बाण सोडला!

Sudesh Mitkar

NCP Prashant Jagtap News : पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये कार्यकर्ते,पदाधिकारी अन् नेत्यांनाा संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावर शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

प्रशांत जगताप(Prashant Jagtap) हे वैयक्तिक कारणासाठी लंडन येथे गेले होते. सध्या ते लंडनवरून पुण्याच्या परतीचा प्रवासात आहे. याच प्रवासादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, 'भाजपच्या अधिवेशनादरम्यान अमित शाह(Amit Shah) हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर घसरले आहेत. मला अमित शाहा यांची कीव करावीशी वाटते. कारण गेली दहा-बारा वर्ष महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांच्यावर टीका करणे हा एकच उद्योग त्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहिला आहे.'

याशिवाय 'महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एवढ्या शुल्लक कारणासाठी ते शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. काही काळापासून पक्ष फोडून भ्रष्टाचारी नेते त्यांनी आपल्या सोबत घेतले आहेत. त्याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावे.' असा टोलाही लगावला.

तसेच 'शरद पवारांवर टीका करणे म्हणजे 'सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को' या प्रकारचे त्यांचे हे वक्तव्य आहे. अशा प्रकारच्या शाहांच्या फौजा यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्रावरती चालून आल्या आहेत. मात्र जनतेने योग्य धडा त्यावेळी ही शिकवला होता आणि आताही शिकवेल.' असं जगताप म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT