Pratap Sarnaik Sarkarnama
पुणे

Pratap Sarnaik Action - ..ते पाहून मंत्री सरनाईक संतापले, अन् थेट एसटी चालक अन् वाहकांवर दिले कारवाईचे आदेश!

Minister Pratap Sarnaik ordered strict action against ST bus driver and conductor : पुणे दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना सरनाईकांनी अचानक भेट दिली

Sudesh Mitkar

Maharashtra Minister Pratap Sarnaik - परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पुणे दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना त्यांनी अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांना मिळणारे खाद्यपदार्थ ताजे आहेत का, आणि योग्य दरात मिळतात का, याची देखील चौकशी केली.

तसेच अधिकृत बस थांबा असलेल्या हॉटेलमधील स्वच्छतागृहांची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रवाशांनी अस्वच्छतेबाबत थेट परिवहनमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत सरनाईक यांनी सदर स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्या सोबतच स्वच्छता राखण्यास संदर्भात सूचना संबंधित हॉटेल मालकाला दिल्या. तसेच वेळेमध्ये या सुविधा न पुरवल्यास हॉटेल थांबा रद्द करू असं देखील हॉटेल मालकाला दरडावलं.

...'त्या' चालक-वाहकांवर कारवाई -

दरम्यान पुणे ते पंढरपूर दौऱ्यादरम्यान सरनाईक यांनी भिगवन जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या दिसल्या. त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवत हॉटेलला भेट दिली. भेटीदरम्यान पाहणी केली असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांची चांगलीच खरडपट्टी काढली तसेच संबंधित चालक वाहकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

भिगवणला लवकरच नवे बसस्थानक होणार -

मंत्री सरनाईक यांनी भिगवन बसस्थानकाला देखील भेट दिली. तेथील असुविधेबाबत स्थानिक रहिवाशांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवन बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT