Nashik land Scam : नाशिक पोलीस आयुक्तालयच हडपण्याचा डाव!, ३०० कोटींच्या घोटाळ्यात अडकले बिल्डर

Nashik scam case : शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आणि मध्यवर्ती भाग असलेल्या शरणपूर रोड भागातील जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Nashik land Scam
sarkarnama
Published on
Updated on

Background of the Nashik Commissionerate Land Grab : नाशिक शहरात गेली काही वर्षे प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांकडून ख्रिस्ती समाजाच्या मालकीच्या जमिनी हडप करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे यामध्ये शहरातील बहुतांश प्रथीतयश बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असल्याचे बोलले जाते. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज निर्णय घेतला आहे.

शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आणि मध्यवर्ती भाग असलेल्या शरणपूर रोड भागातील जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे यामध्ये चक्क नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची इमारतीचाही समावेश आहे. इमारतीसह जमीन खरेदी करून ती हडप करण्याचा डाव उघड झाला आहे.

यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी मध्यरात्री सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक डायोसेशन कौन्सिल मुंबई पब्लिक ट्रस्ट अंतर्गत बनावट ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. या ट्रस्टच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाच्या काही मंडळींनी या जमिनी विक्रीचा सपाटा चालवला होता. त्यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयाचाही समावेश होता.

यासंदर्भात ट्रस्टचे संचालक अविनाश बलकुंडी यांसह 14 विश्वस्तांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. 300 कोटी रुपयांची ही जमीन बनावट दस्त करून बांधकाम व्यवसायिकांनी खरेदी केली होती. या खरेदीला बनावट ट्रस्ट स्थापन करून त्या विश्वस्तांनी मान्यता दिली.

Nashik land Scam
Rahul Gandhi - राहुल गांधींसाठी आव्हान ठरताय 'ही' तीन राज्ये; अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बसतोय फटका

हा धक्कादायक व्यवहार केल्याने शासनासह ख्रिस्ती समाजाच्या मूळ ट्रस्टची देखील फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी हा प्रकार लक्षात आल्यावर संबंधित जमिनीच्या खरेदी विक्रीवर मनाई आणली होती. या मनाई नंतर देखील कायद्याचा तरतुदीतून पळवाटा शोधून कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार करण्यात आला.

याबाबत पंकज प्रभाकर मालपुरे, पिंकेश भूपेंद्र शहा, प्रवीण पंडित उन्हवणे, माधुरी अरुण पाटील, कविता मधुकर पाटील, मे. राजश्री गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड, मे. राजश्री डेव्हलपर्सचे संचालक राजेंद्र रसिकलाल शहा, रजनी अमृतलाल खैरनार, वल्लभदास वीरजी ठक्कर, वैभव विजय पाटील, किरण पुंडलिक चव्हाण, भक्ती भाव हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड, दीपशिखा फार्मर्स लिमिटेड, निर्माण आश्रय डेव्हलपर्स नेमीचंद पोद्दार, नवरत्न लँड्स अँड स्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नेमीचंद पोद्दार यांसह अन्य बांधकाम व्यवसायिक व संस्था तसेच नाशिक डायव्हर्सेशन ट्रस्टच्या विश्वस्त अशा २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik land Scam
Bihar election : तेजस्वींचे भाग्य लालू यादव बदलणार, की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असणार!

शहरातील सर्वच प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिकांनी चक्क बनावट ट्रस्टच्या व्यवसायिकांमार्फत जमिनी खरेदी करून त्या विकसित केल्याचे उघड झाले आहे. गेल्या 35 वर्षांपासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे आढळले आहे. यामध्ये चक्क नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाच्या इमारतीचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com