Pratap Shilimkar Sarkarnama
पुणे

Pratap Shilimkar News : प्रताप शिळीमकर करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंना वेल्हे तालुक्यातून धक्का!

Velhe Taluka NCP : भोर विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदाचा राजीनामा

सरकारनांमा ब्यूरो

NCP Politics : वेल्हे सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रताप शिळीमकर यांनी पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या या निर्णयामुळे वेल्हे (राजगड) तालुक्यातुन शरद पवार गटाला धक्का मानला जात आहे.

प्रताप शिळीमकर यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भोर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत असुन येत्या दोन दिवसांत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.

वेल्हे (राजगड) तालुक्याचा विकास होण्यासाठी विकासाभिमुख नेतृत्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून, सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असल्याची शिळीमकर यांनी माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रताप शिळीमकर यांचा प्रथम काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन वेल्हे तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. त्यांची पत्नी वेल्हे पंचायत समितीच्या माजी सदस्य आहे. राजगड कारखान्यावर उपाध्यक्ष म्हणुन त्यांनी काम केले आहे व विद्यमान संचालक आहेत त्यांच्या अजितदादा गटातील प्रवेशामुळे वेल्हे तालुक्यातील या गटाची ताकद वाढली आहे.

प्रताप शिळीमकर यांनी माहिती देताना सांगितले की, 'माझीा कोणालाही दुखवण्याची भावना नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत मी माझ्या कार्यकर्त्यांसह सहभागी होत होतो. मात्र शरदचंद्र पवार गटात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आले उमेदवार सुप्रिया सुळे आणि पदाधिकाऱ्यांना माझी गरज आहे की नाही, अशी शंका मला आली दिवसभर दौऱ्यात असून देखील खासदार सुळे साधा संवाद साधत नाही की ओळख देत नाहीत.'

ही बाब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनाला चटका देणारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारी बाब असल्याने मी शरदचंद्र पवार गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.' तसेच लवकरच सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी होणार असल्याची माहीती देखील प्रताप शिळीमकर यांनी यावेळी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT