पिंपरी : गेल्या महिन्यात शिवसेनेत (Shivsena) बंड होऊन राज्यातील महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता गेली. तर, या महिन्यात हे लोण राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचले. १२ शिवसेना खासदार हे पक्षाचे बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात १८ तारखेला सामील झाले.
त्यात पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांचा समावेश आहे. ते शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आज (ता.२२जुलै) प्रथमच मतदारसंघात म्हणजे घरी (थेरगाव, पिंपरी-चिंचवड) दिल्लीहून येत आहेत. त्यांच्या स्वागताची जोरात तयारी करण्यात आली आहे. (Pimpri Police, MP Shrirang Barne Latest News)
संसदेच्या अधिवेशनानिमित्त गेल्या आठवड्याच्या शेवटी (ता.१७ जुलै) खासदार बारणे दिल्लीला गेले होते. उद्या, परवा अधिवेशनाला सुट्टी असल्याने ते आज मतदारसंघात परतरणार आहेत. दुपारी चार वाजता पुणे विमानतळावर ते उतरतील, त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असल्याचे त्यांचे पूत्र आणि युवासेनेचे पिंपरी-चिंचवड अधिकारी विश्वजीत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. शहरात त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील निवासस्थानीही जल्लोष करण्यात येणार आहे.
बारणे यांच्या आगमनप्रसंगी शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता गृहित धरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रतिबंधक उपाय योजले आहेत. त्यांनी बारणेंच्या निवासस्थानी व तेथील कार्यालयात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव हे ही शिंदे गटात सामील झाले आहेत. एवढेच नाही, तर त्यांना तेथेही उपनेतेपद देण्यात आलेले आहे. त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने परवा खेड (जि.पुणे) या त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेने तीव्र निदर्शने केली. त्यांचा पुतळा जाळला. त्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली. त्याप्रकरणी काही आजी, माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती खा. बारणेंच्या बाबतीत घडण्याची शक्यता गृहित धरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
शहरात बारणे व आढळराव यांचेच समर्थक सर्वाधिक आहेत. तर, त्यांच्या विरोधातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या तुरळक असून ते कमी ताकदवान आहे. त्यामुळे बारणेंच्या आगमनप्रसंगी शिवसेनेकडून आंदोलन वा निषेध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यात कालच त्यांनी या दोघा आजी, माजी खासदाराविरुद्ध ते केले आहे. त्याकडे सुद्धा प्रमुख पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आज बारणेंच्या स्वागताला अडथळा येणार नाही, अशीच चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.