Ajit Pawar news
Ajit Pawar news Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On President's Rule: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार स्पष्टचं बोलले

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar spoke on President's rule : राज्यातील संत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसातच यावर निकालही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं भवितव्याकडे सध्या राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते,' असे भाकित केले होते. या मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ) (President's rule in the state? Ajit Pawar spoke clearly on Jayant Patal's statement

जयंत पाटील यांच्या भाकिताबाबत विचारले असता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. '' मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. पण जयंत पाटील यांचे स्टेटमेंट मी पाहिलंय. त्यांची आणि माझी दोन एप्रिला भेट होईल. तेव्हा मी त्यांना विचारेन की बाबा, आपल्याला असा काय क्लू मिळालाय, याबाबत आपल्याकडे अशी कोणती माहिती आहे की, ज्या माहितीच्या आधारे आपण असे वक्तव्य केलं.

दरम्यान, जयंत पाटलांनी यापू्र्वीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याचे वक्तव्य केले होते. त्याचा पुनरुच्चार करत त्यांनी यावेळी राष्ट्रपती राजवटीवर विधान केले होते. जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यात बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली, तर हे आमदार उद्धव ठाकरेंकडे परत जातील. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय कोणताही पर्याय असणार नाही, असंं जयत पाटील यांनी म्हटलं होतं. (Ajit Pawar spoke on President's rule )

दरम्यान, भाजप खासदार गिरीष बापट यांचे दोन दिवांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने लोकसभेची त्यांची जागा रिकामी झाली आहे. पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीप्रमाणे लोकसभेचीही पोटनिवडणूक लगेच लागेल क असा प्रश्न त्यांना विचारला असता अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

''लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीष बापट यांना जाऊन आज फक्त तिसरा दिवस आहे. इतकी काय यामध्ये घाई आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही. काही महाराष्ट्राची परंपरा आहे की नाही. लोकं म्हणतील यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची आहे की नाही.''असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT