auto rikshow
auto rikshow sarkarnama
पुणे

पुणे, पिंपरी चिंचवडकरांच्या खिशाला कात्री; रिक्षा प्रवास महागला : असे आहेत नवे दर

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी चिंचवडसह पुण्यातील (pune)रिक्षा प्रवास आता महागणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), रिक्षा संघटना, ग्राहक व प्रवासी संघटना यांच्या बैठकीत काल (शुक्रवार) रिक्षा भाडेवाढीचा निर्णय झाला.

दोन दिवसात याबाबतची घोषणा पुणे 'आरटीओ' कडून होण्याची दाट शक्यता आहे. २१ रुपये हे किमान रिक्षाभाडे (auto rikshow) आता २७ रुपये होणार आहे. मुंबईपेक्षा पुण्यातील रिक्षाप्रवास महाग झाला आहे. कारण मुंबईत किमान रिक्षाभाडे हे २१ रुपये आहे.

रिक्षाभाडेवाढीचा मीटप्रमाणे भाडे आकारणी होत नसलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर विपरित परिणाम होणार आहे. कारण आता अंदाजे भाडे घेण्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योगनगरीत बहूतांश रिक्षा या मीटरनुसार भाडे आकारणी करीतच नाहीत. एक,तर त्या अंदाजे ठराविक भाडे घेतात वा टप्पा वाहतूक करतात.

एका रिक्षातून सहा प्रवाशांना कोंबून अवैध धोकदायक वाहतूक केली जात आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या पियाजो रिक्षांना,तर मीटरच नाहीत.त्या शंभर टक्के मीटरनुसार भाडे आकारतच नाहीत. यामुळे रिक्षाचालकाकंडून पिळवणूक होत असल्याचा तक्रारी आहेत. मात्र,त्यावर आरटीओकडून कारवाई होत नाही.

अवैध प्रवासी वाहतुकीचा हफ्ता मिळत असल्याने शहर पोलिसांचा वाहतूक विभागही अर्थपूर्ण दुर्लक्ष या धोकादायक, बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीकडे करीत असल्याचे प्रवाशांचेच म्हणणे आहे.

या महिन्यात २५ तारखेला रिक्षाभाड्यात दोन रुपयांनी वाढ आरटीओने दिली होती. त्यामुळे किमान भाडे २१ वरून २३ रुपये होणार आहे. ही भाडेवाढ १ ऑगस्टपासून लागू होणार होती. मात्र, रिक्षाचालक संघटनांनी तिला क़डा़डून विरोध केल्याने ती स्थगित ठेवण्याची पाळी प्रादेशिक परिवहन विभागावर आली होती. त्यानंतर काल झालेल्या बैठकीत सात रुपयांची वाढ रिक्षाचालक संघटनांनी मान्य केली.त्याबाबत आरटीओ येत्या सोमवारी (ता.८) घोषणा करण्याची शक्यता आहे.

आठ महिन्यात दुसऱ्यांदा ही रिक्षा दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरला तीन रुपयांनी रिक्षा भाडेवाढ होऊन ती १८ वरून २१ रुपये झाली होती. सहा वर्षांनी ही तीन रुपयांची वाढ मिळाली होती. तर, आता फक्त आठ महिन्यात सात रुपयांची मिळाली आहे. त्यामुळे ती ऐतिहासिक असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

सीएनजी यावर्षी २७ रुपये प्रतिकिलो महागल्याने आम्ही तीस रुपये किमान भाड्याची मागणी केली होती, असे ते म्हणाले. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २७ रूपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटर पाठीमागे १८ रूपये द्यावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT