Shrirang Barne and Narendra Modi
Shrirang Barne and Narendra Modi Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : नऊवारी नेसून दुचाकीवर जगभ्रमंती; चिंचवडच्या रमिलाला मोदींनी दिला आशिर्वाद

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंतीवर निघालेल्या पिंपरी-चिंचवडकर रमिला लटपटे या २८ वर्षीय तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता.२१) दिल्लीत भेट घेतली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मोदींनी रमिलाला करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघातील रमिलाची मोदींशी भेट बारणेंमुळेच झाली. अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी ती कार्यरत आहे. ‘रमा’(रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या मोहिमेअंतर्गत मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून महिलादिनाचे औचित्य साधून जगभ्रमंतीवर ती निघाली.

१८०० किलोमीटरचे अंतर कापून आज ती दिल्लीत पोहोचली आहे. पुढील वर्षी महिलादिनीच ती पुन्हा मायदेशी परतणार आहे. जगातील सहा खंडातील ४० देशांना ती नऊवारीतून दुचाकीवरच भेट देणार आहे. भारत की बेटी म्हणून ही जगभ्रमंती ती करीत आहे. त्यातून लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे, असे ती म्हणाली.

मोदींची भेट घेवून पुढील प्रवास करण्याची विनंती रमाबाईने माझ्याकडे केली होती. त्यानुसार मी वेळ मागितली अणि ती लगेच मिळाली, असे खासदार बारणे म्हणाले.

तिच्या व्हिसाची समस्या सोडविण्याचे तसेच इतरही सहकार्य करण्यास मोदींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला या भेटीत सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त तिला त्यांनी गुढी भेट देत आशिर्वादही दिला. मतदारसंघातील असल्याने रमिलाला मी पूर्ण सहकार्य करत आहे, असे बारणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT