Sanjay Shirsat News : तुम्ही शिव्या दिल्या, तर आमच्या तोंडातून फुलं बाहेर पडणार नाहीत..

Shivsena : एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला आम्ही काही महात्मा गांधी नाही, थोबाडं सुजवू.
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut News
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कृतीत वाढलेला माणूस अशी भाषा कशी वापरू शकतो याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. संजय राऊत (Sanjay Raut) तोंडाला येईल ते बोलतो, शिव्या देतो. मग आम्ही काय त्याची पुजा करायची का? एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करायला आम्ही महात्मा गांधी नाहीत. त्याला समजेल त्याच भाषेत आम्ही बोलू, त्याने गालात मारली तर आम्ही थोबाडं सुजवू, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना इशारा दिला.

Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut News
Chandrakant Khaire News : परिवर्तन अटळ, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता..

विधीमंडळ परिसरात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना माध्यमांशी ते बोलत होते. खोक्यांवरून टीका, रोज उठून आम्हा आमदारांना वाटेल ते बोलणाऱ्या व्यक्तीची आम्ही आरती ओवाळू अशी अपेक्षा कोणी करू नये, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. राज्याच्या राजकारणात शिंदे गट विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष पुन्हा भडकला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यावर राऊतांना भ्रष्टाचाराचा आरोप केला. (Shivsena) त्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले.

शिवसेनेची भाकरी खाऊन शरद पवाराची चाकरी करणारा, अशी टीका राऊत यांच्यावर केली गेली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना आमदार संजय शिरसाट यांनी देखील राऊत यांच्या टीकेला, भाषेला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले. शिरसाट म्हणाले, कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते, ती ओलांडली की असे घडणारच. तुम्ही आम्हाला शिव्या द्याल तर तुम्हाला देखील शिव्याच मिळतील, तुमच्या साठी आमच्या तोंडून फुलं बाहेर पडतील अशी अपेक्षा करू नका.

एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला आम्ही काही महात्मा गांधी नाही आहोत, आम्ही तुमचं थोबाडं सुजवू. आनंदाचा शिधा खोक्यांमधून येणार का? अशी टीका विरोधकांकडून केली जातेय, यावर देखील शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही तो शिधा आमच्या घरी शिजवून खातोय का? टीका करा, पण आपण कशावर बोलतोय याचे भान तरी ठेवा.

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता, आमदार निवासात झाडू मारायला देखील माणूस नव्हता. त्यामुळे कुठे शिधा पोहचला नसेल तर लगेच टीका करणे योग्य आहे का? कशाचाही संबंध कुठेही जोडू नका. अडीच वर्ष तुम्ही जनतेला गाजर दाखवले, आम्ही घराघरात शिधा पोहचवतोय. गरीबाच्या घरात सणासुदीला गोडधोडं झालं पाहिजे, त्यांच्या पोटात दोन घास गेले पाहिजे हा यामागचा हेतू आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com