Congress
Congress Sarkarnama
पुणे

काँग्रेसला लागली चिंता; उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते नेमकी कोणाची!

सरकारनामा ब्यूरो

बारामती : राज्यसभेच्या निवडणुकीचा (Rajya Sabha election) निकाल पहाटे ४ वाजता जाहिर झाला. त्यामध्ये भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार विजयी झाले. सहाव्या जागेवरुन सुरु असलेली लढाई भाजपने (BJP) जिंकली. आघाडीची १० मते फुटल्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला. आता ही फुटलेली मते आणि आघाडीच्या उमेदवारांना जादाची पडलेली मते कोणाची आहेत. याची आकडेमोड केली जात आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेनेने (Shivsena) आपल्या उमेदवारांसाठी ४२ मतांचा कोठा ठेवला होता. मात्र, काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रताप गढी यांना ४४ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या (NCP) प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेचे एक मत बाद झाल्यामुळे संजय राऊत यांना ४१ मते मिळाली.

या विषयी बोलताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, निकालाचे विश्‍लेषण आम्ही केलेले नाही. काँग्रेस पक्षाने ठरल्याप्रमाणे सर्व मतदान केले आहे. 42 मतांचा कोटा होता त्याप्रमाणे आम्ही काँग्रेसच्या उमेदवारांला मते दिली आहेत. दोन अतिरिक्त मते कशी पडली त्याची चौकशी आम्ही करत आहोत. चूक झाली किंवा रणनीतीत कसे कमी पडलो याचा शोध घेणार आहोत. एक दोन दिवसात आणखीन स्पष्ट होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

नेमके चुकले कुठे याचा अभ्यास करावा लागेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. राज्यसभेचे आमचे चारही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून यावेत अशी अपेक्षा होती. मात्र, चौथा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होने आवश्यक होता. परंतु का झाला नाही याचा अभ्यास करावा लागेल. यात पसंतीच मत असत गणित असत सुत्र असत याचा अभ्यास आम्हाला नक्कीच करावा लागेल, आमचे चुकले कुठे. परंतु एका पराजयाने काही होत नाही. आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

यावेळी थोरात यांना विधान परिषद निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला एकत्र बसावे लागेल. चर्चा करावी करावी लागेल. याची चर्चा झाल्याशिवाय आता बोलणे उचित होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT