Pune SIR voter verification: महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रिया अखेर सोमवारी पूर्ण झाली. आयोगाकडून एसआयआर प्रक्रियेसाठी दहा दिवसांची मुदतवाढ दिली होती.
आता मतदारांकडून घेण्यात आलेल्या गणना अर्जांच्या डिजिटायझेशनची मुदतही सोमवारी संपली आहे. या प्रक्रियेची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी(ता.20) जाहीर केली जाणार आहे. मात्र, आयोगाच्या संभाव्य यादीनुसार, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहीम राबवण्यात आली. या प्रक्रियेपूर्वी पुणे शहरातील या सर्वच्या सर्व मतदारसंघात एकूण 34 लाख 65 हजार मतदारांची नोंद होती. मात्र, आता नुकत्याच राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेद्वारे मतदार याद्यांतील अनुपस्थित, स्थलांतरित मृत आणि दुबार मतदारांची नावं वगळली जाणार आहे.
एसआयआर प्रक्रियेनंतर आयोगाच्या संभाव्य मतदारयादीनुसार, पुणे शहरातील कोथरुड,शिवाजीनगर, वडगाव शेरी, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा अशा आठही विधानसभा मतदारसंघातील 14 लाख 85 हजार म्हणजेच शहरातील एकूण मतदारसंख्येपैकी तब्बल 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून एसआयआर प्रक्रियेनंतर सर्वाधिक 2 लाख 98 हजार तर कसबा मतदारसंघातून सर्वात कमी 92 हजार मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून अगोदर 24 ऑगस्ट रोजी प्रारूप यादी जाहीर केली जाणार होती. मात्र, एसआयआर प्रक्रियेला दहा दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर आता 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एसआयआर मोहिमेनंतर शहरात संभाव्य यादीनुसार 19 लाख 80 हजार 242 इतके मतदार राहणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेतंर्गत मतदार यादीतील प्रत्येक मतदाराला गणना अर्ज दिला गेला होता. या अर्जावर मतदाराचं नाव, ओळखपत्र क्रमांक, पत्ता, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक, विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचं नाव आणि मतदाराचे छायाचित्र आदी होती.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार,संबंधित मतदाराला हा अर्ज देऊन त्याचे मतदार यादीमधील आई, वडील यांची माहिती भरण्यास सांगण्यात आलं होतं. होती. याचदरम्यान, मतदारांचे आधार कार्ड क्रमांक आणि फोटोही जमा करुन घेण्यात आले होते. अशाप्रकारे मतदारांकडून देण्यात आलेले संबंधित गणना अर्जात आवश्यक ती सर्व माहिती अपलोड करण्यात आली आहे.
संभाव्य प्रारूप मतदार यादीनुसार वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या :
वडगाव शेरी - 2 लाख 4 हजार 102
शिवाजीनगर- 1 लाख 30 हजार 233
कोथरुड - 2 लाख 7 हजार 279
खडकवासला - 2 लाख 78 हजार449
पर्वती - 1 लाख 52 हजार 20
हडपसर - 2 लाख 98 हजार 546
पुणे कॅन्टोन्मेंट- 1 लाख 21 हजार 846
कसबा पेठ 92 हजार 585
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.