

Prakash Ambedkar News : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. ठाकरेंचे वकील आपली बाजु मांडत आहे. दरम्यान, या सुनावणी बाबत 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाष्य केले आहे.
ते म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले 'धनुष्यबाण' या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल.'
पुढे ते म्हणाले 'तो म्हणजे 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील.कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे.'
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.
कायदेशीर मुद्द्यांवर प्रकाश टाकताना ॲड. आंबेडकरांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या वादात मूळ कायदेशीर क्षेत्राचा प्रश्न डावलला जात आहे. सादिक अली खटल्याच्या वेळी राजकीय पक्षांची नोंदणी सक्तीची नव्हती आणि ते केवळ एक असोसिएशन म्हणून कार्यरत होते, त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार होता. मात्र, १९८९ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून कलम २९ (अ) समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे राजकीय पक्षांचे कायदेशीर अस्तित्व निर्माण झाले. नागरी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कायद्याने काढून घेतलेले नसताना, राजकीय पक्षांमधील अंतर्गत भांडणे सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून नागरी न्यायालयांनाच आहे. निवडणूक आयोगाला नागरी अधिकार क्षेत्र नसतानाही अशा प्रकारे निर्णय दिले जाणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी नमूद केले की, जरांगेंनी आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली असली, तरी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही प्रति आव्हानाची भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत घडलेल्या घटनांनंतर आता संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात का?, हा मोठा प्रश्न आहे. आगामी काळात ओबीसी मतांचे महत्त्व लक्षात घेता जरांगेंना पूर्वी पाठिंबा देणारे घटक त्याच ताकदीने सोबत राहतील का, यावरच मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरेल आणि याबाबतचा अंतिम निर्णय जनता व मतदारच करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.