BJP forest minister Ganesh Naik Sarkarnama
पुणे

Pune leopard area marriage issue : बिबट प्रवण क्षेत्रातला नवरा नको गं बाई! वनमंत्री गणेश नाईक म्हणतात...

Ganesh Naik Reacts to Girls Refusing Marriage in Leopard-Prone Area of Pune Ahilyanagar : पुणे अन् अहिल्यानगर भागातील बिबट प्रवण क्षेत्रात मुली लग्नाला तयार होत असल्याच्या प्रकारावर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

BJP forest minister Ganesh Naik : शेतकरी नवरा नको असं म्हणणाऱ्या मुली आता बिबट प्रवण क्षेत्रातला नवरा नको, असं म्हणू लागल्या आहेत. पुणे, अहिल्यानगर, नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट प्रवण क्षेत्रामुळे ही समस्या उद्भवली आहे. यावर तोडगा कसा निघणार, याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

'हे खरं आहे. काही ठिकाणी दुष्कामुळे आई-वडील आपल्या मुली त्या भागात देत नाही. पण उत्तर पुणे या भागात बिबट्याच्या दहशत झाल्यानं, खरोखर असं वाटणं सहाजिक आहे. परंतु लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करणार', असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीचं भय इतकं वाढलंय की आता त्याचा परिणाम थेट समाज जीवनावरही होऊ लागला आहे. बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही ठिकाणी मुलांना लग्नासाठी मुली देण्यासही पालक नकार देत आहेत.

बिबट्याच्या (Leopard) दहशतीमुळे विवाहसंबंधांवर परिणाम होणं ही ग्रामीण भागातली नवी आणि चिंताजनक वास्तवता ठरत आहे. बिबट्याचा लवकरच बंदोबस्त होऊन, लग्न जुळवण्यातील अडथळे दूर होतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घातला.

शिरूरमधील वाघाळे इथले शेतकरी बाळासाहेब रमाजी थोरात यांच्या गोठ्यातील दहा शेळ्या आणि मेंढ्या बिबट्याने शिकार केल्या. बिबट्याच्या या शिकारीमुळे थोरात कुटुंब आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलं असून त्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

पुणे, अहिल्यानगरमध्ये समस्या

पुणेपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. कोपरगावमधील येसगावातील वृद्धा शांताबाई निकोले यांचा मृत्यू झाला. यापूर्वी नंदिनी चव्हाण या मुलीचा मृत्यू झाला. शांताबाई निकोले यांच्यावर ज्या दिवशी बिबट्याने हल्ला केला होता, त्याच दिवशी सायंकाळी सुरेगाव इथं अनिल वाबळे यांच्या शिवारात घडली. या शिवारात एका कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला.

बिबट्यामुळे लग्नाला खोडा

अशा घटनांमुळे शेती व्यवसायवर परिणाम होऊ लागला आहे. तसंच बिबट प्रवण भागात मुलींनी नकार देण्यास सुरूवात केली आहे. यात मुलींचे आईवडील आघाडीवर आहे. लग्नासाठी बिबट प्रवण भागातील मुला-मुलींचे स्थळ आल्यावर त्याची अधिक चौकशी केली जात आहे. मुलींकडून थेट नकाराचा निरोप मुलांपर्यंत पोहोचवला जात आहे. मुलांकडील लोकांनी कारणांची चौकशी केल्यावर त्याला बिबट्यांचे हल्ल्यांची कारणं सांगितली जात आहेत.

शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी एक भर

ही कारण जरी धक्कादायक असली, तरी त्यातून समाज जीवनावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. दुष्काळ अन् बेभरवशाची शेतीमुळे, पूर्वी शेतकरी नवरा नको गं बाई, असे म्हटले जायचे. आता या लग्नाचे वय असलेल्या शेतकऱ्याला मुली न देण्याचं कारण बिबट ठरू लागल्याने, शेतकऱ्याच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. यावर सरकारकडून उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT