Security personnel inspect a Guwahati-bound aircraft at Pune International Airport after an air hostess discovered a bomb threat note inside the aircraft toilet. Sarkarnama
पुणे

Pune Airport : पुणे विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा! गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाच्या टॉयलेटमध्ये एअर होस्टेसला 'ती' चिट्टी सापडली अन् एकच गोंधळ

Pune International airport security alert : एक विमाण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुवाहाटीसाठी उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी विमानात बसले होते आणि विमान झेप घेण्याच्या तयारीत होते. दरम्यान, सकाळी पावणे सातच्या सुमारास विमानावरील एअर होस्टेसने नेहमीप्रमाणे प्रसाधनगृहाची पाहणी केली.

Sudesh Mitkar

Pune News, 31 May : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (ता.२९) सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार घडला आहे. पुणे येथून गुवाहाटीला जाण्यासाठी सज्ज असलेल्या एका विमानाच्या टॉयलेट मध्ये एअर होस्टेस ला एक चिठ्ठी सापडल्याने विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमका काय घडला प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीचे विमान शुक्रवारी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुवाहाटीसाठी उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी विमानात बसले होते आणि विमान झेप घेण्याच्या तयारीत होते. दरम्यान, सकाळी पावणे सातच्या सुमारास विमानावरील एअर होस्टेसने नेहमीप्रमाणे प्रसाधनगृहाची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान तिला तिथे एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीवर ठळक अक्षरात 'बॉम्ब' असे लिहिलेले होते. चिठ्ठी पाहताच एअर होस्टेसने तात्काळ याची माहिती विमानाचे पायलट आणि विमानतळ सुरक्षा यंत्रणांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून विमान तात्काळ धावपट्टीवरून बाजूला एका निर्मनुष्य ठिकाणी नेण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने आणि सुखरूप खाली उतरवण्यात आले.

यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानाचा ताबा घेतला. विमानाचा कोपरा न कोपरा आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. तासभर चाललेल्या या सखोल तपासणीनंतर विमानात कोणतीही बॉम्बसदृश वस्तू अथवा स्फोटक पदार्थ सापडला नाही. तो केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सर्व तपासणी पूर्ण होऊन विमान सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, विमानाला गुवाहाटीच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान, विमानातील प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या त्या चिठ्ठी लिहिणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चिठ्ठी कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली, याचा अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT