Pune News, 07 Apr : महापौर मंजुषा नागपुरे यांना विमानतळ प्रवेश पास नसल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सोमवारी पुणे विमानतळावर उपस्थित राहता आले नाही. यामुळे महापौरांनी प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.
शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर सामान्यतः शहरात येणाऱ्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आवर्जून उपस्थित असतात. मात्र, यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांचा ३ वर्षांसाठीचा विमानतळ प्रवेश पास अद्याप काढण्यात आला नव्हता. फोटो, आधार कार्ड, निवडणूक पत्र यासह इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण करूनच पास काढता येतो.
एक दिवसाच्या पाससाठीही ही प्रक्रिया अनिवार्य आहे. महापौर कार्यालयाने प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या स्वागतासाठी पास काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अल्पावधीत ते शक्य झाले नाही. परिणामी महापौरांना मंत्र्यांचे स्वागत करता आले नाही. यानंतर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या नगरसचिव योगिता भोसले यापूर्वी राजशिष्टाचार अधिकारी होत्या. त्यांची नगरसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे आणि त्याचा प्रभारी चार्जही कोणालाही दिलेला नाही. त्यामुळे विमानतळ पास काढण्याची जबाबदारी नक्की कोणाची, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या संदर्भात जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले “रविवारी रात्री महापौर मंजुषा नागपुरे यांनी विमानतळ प्रवेश पास काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी बोललो. तीन वर्षांच्या कालावधीसाठीचा पास लवकरात लवकर काढला जाईल. यासाठी महापौर कार्यालयाच्या संपर्कात आहोत.” याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.