Trump Iran Warning : इराण धमक्यांना जुमानेना! अखेर ट्रम्प यांनी थेट व्हाईट हाऊसमधून केली सर्वात मोठी घोषणा, आज रात्री 8 वाजेपर्यंत...

Hormuz Strait Crisis : एकीकडे ट्रम्प हे इराणला धमकी देत आहेत तर दुसरीकडे इराण ट्रम्प यांना गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे. आतापर्यंत इराणने ट्रम्प यांच्या एकाही धमकीला आणि इशाऱ्याला दाद दिलेली नाही. शिवाय इराण आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हार्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही यावर ठाम आहे.
Donald Trum
Donald Trump issues a strong warning to Iran over the Hormuz Strait crisis during a White House address, highlighting escalating US-Iran tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Hormuz Strait Crisis: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध सुरू झाल्यापासून इराणला दररोज एक इशारा देत आहेत. मात्र, काहीही झालं तरी त्यांच्या इशाऱ्याला इराण दाद देत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच संतापले आहेत.

त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी इराणला शेवटचा आणि गंभीर इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसाठी ही शेवटची संधी असून होमुर्झची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

शिवाय आता जर इराणने होमुर्झची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणला खूप मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागेल. आता इराणवर असा हल्ला करू की तो थेट पाषाण युगात जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यावेळी ट्रम्प यांनी थेट आज रात्री 8 पर्यंतची वेळ दिल्यामुळे आता ते नेमकं काय करणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Donald Trum
Parth Pawar vs Congress : 'वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने...', 'डाऊनफॉल' म्हणणाऱ्या पार्थ पवारांवर काँग्रेसची बोचरी टीका

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

इराणला इशारा देताना ट्रम्प म्हणाले, 'इराणने 7 दिवसांची मुदत मागितली होती, पण मी त्यांना 10 दिवस दिले. आता त्यांच्याकडे फक्त उद्यापर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर काय होईल हे संपूर्ण जग बघेल. या युद्धामुळे अनेक लोक प्रभावित झालेत. पण उद्या रात्री 8 नंतर त्यांच्याकडे कोणतेही पूल आणि पॉवर प्लांट शिल्लक नसतील. इराण थेट पाषाण युगात जाईल.', असा गंभीर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

Donald Trum
US Iran conflict : मोठी बातमी : काही तासांत इराणमध्ये हाहाकार? अमेरिका सर्वात मोठा विध्वंसक हल्ला करणार, जगाची धाकधूक वाढली...

शिवाय यावेळी त्यांनी युद्ध सुरू झालं तेव्हा इराण शक्तिशाली होता. पण, आता अमेरिकेने इराणला खिळखिळ केलं आहे. जे काम मागील 7 अध्यक्षांनी 47 वर्षांत करायला पाहिजे होतं. ते मी आता करत आहे. मला हे करायला आवडत नाही, पण हे खूप आधीच केलं पाहिजे होतं, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

एकीकडे ट्रम्प हे इराणला धमकी देत आहेत तर दुसरीकडे इराण ट्रम्प यांना गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे. आतापर्यंत इराणने ट्रम्प यांच्या एकाही धमकीला आणि इशाऱ्याला दाद दिलेली नाही. शिवाय इराण आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हार्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही यावर ठाम आहे. त्यामुळे आता या संघर्षात पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com