Ravindra Dhangekar addressing media over the Jain Boarding Trust controversy in Pune, demanding that ₹230 crore from the land sale be frozen for the welfare of the trust and students. Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar: पुण्यात आणखी एक जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार चव्हाट्यावर! धंगेकरांनी पुन्हा टाकला बॉम्ब

Ravindra Dhangekar: पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी भागातील जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टींनी २३० कोटींना गोखले बिल्डर्सला बेकायदा पद्धतीनं विकल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर आला आहे.

Amit Ujagare

Ravindra Dhangekar: पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी भागातील जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टींनी २३० कोटींना गोखले बिल्डर्सला बेकायदा पद्धतीनं विकल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर आला आहे. शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख आणि कसब्याचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनीच हा दावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून यामध्ये जैन बोर्डिंगमधील एक ट्रस्टीच या नव्या घोटाळ्यातही सामील असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

धंगेकर ट्विटरच्या पोस्टमध्ये लिहितात की, "पुण्यातील औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट (पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या मालकीची 33,700 चौरस फुटांची जागा विक्रीसाठी ट्रस्टींनी प्रस्तावित केली आहे. या विक्रीसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी सेक्शन 36 अंतर्गत पुणे येथील चॅरिटी कमिशनर कार्यालयात मागील मे महिन्यात अर्ज दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून HND जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच ट्रस्टी या व्यवहारात देखील मुख्य सूत्रधार आहे"

धंगेकर पुढे म्हणतात, "परवाच मी म्हटल होतं जैन बोर्डिंगच्या गैरव्यवहारातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करावेत. नाहीतर हे या पुढील काळात देखील ट्रस्टच्या जागा विकण्याचा धंदा सुरूच ठेवतील. या व्यवहारात HND हॉस्टेल विक्री टोळीतीलच लुटारु सहभागी आहेत का? याचा शोध घ्यावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा कोणा लोकप्रतिनिधीचा हात आहे का? अशीही शंका उपस्थित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT