DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar Sarkarnama
पुणे

Pune ATS News : धक्कादायक! DRDO चे संचालक अडकले हनी ट्रॅपमध्ये, पाकिस्तानला पाठवली संवेदनशील माहिती?

DRDO Officer Arrest In Pune : हनी ट्रपमध्ये अडकला उच्चपदस्थ संचालक..

सरकारनामा ब्यूरो

DRDO Officer Arrest In Pune : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरूळकर यांना एटीएस कडून अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून शत्रूराष्ट्र पाकिस्तानला कुरूळकर माहिती पुरवत असल्याचा संशयातून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संबंधीचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

डीआरडीओ ही संस्था लष्कराच्या युद्धसाहित्य आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचा काम करते. यामुळे ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील संस्था आहे. याचे संचालक करूलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले.

त्यांनी व्हिडाओ चॅटच्या माध्यमातून आणि इतर सोशल मिडीयाचा माध्यमातून महत्त्वाची आणि संवेदनशील गुपितं माहिती पाकिस्तानला दिली गेली, असा संशय एटीएसला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपाल आता पुणे एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

डि. आर. डी. ओ. चे संचालक कुरूलकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी संवेदनशील माहिती, शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत त्यांनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT