Pune Bhutanese woman rape case  Sarkarnama
पुणे

Pune rape case : पुण्यात भुतानच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक, शिक्षणासाठी मदत केली अन् गैरफायदा घेतला

Pune Bhutanese woman rape case : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानमधील एका 27 वर्षीय तरुणीवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Jagdish Patil

Pune News, 09 Apr : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यात वास्तव्यास असलेल्या भुतानमधील एका 27 वर्षीय तरुणीवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिला ही मूळची भूतान देशातील असून ती 2020 पासून पुण्यात राहत आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने या तरूणीला आरोपींनी राहण्यासाठी जागा आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर त्यांनी ओळखीचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीची शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने आरोपी ऋषिकेशसोबत ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेशने तिची ओळख शंतनू कुकडेसोबत करून दिली. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) माजी पदाधिकारी असून नुकतंच काही दिवसांपूर्वी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच आरोपी कुकडेने पीडित तरूणीला पुण्यात राहण्याची सोय केली आणि काही आर्थिक मदत केली. त्यानंतर त्याने ओळखीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र, कुकडेने एकट्याने नव्हे तर त्याच्या मित्रांनी देखील या तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पीडित तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Police) यावरून शंतनू कुकडेसह ऋषिकेश नवले, मुद्दासीन मेनन, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे आणि ॲड. विपीन बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तर या प्रकरणातील शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवतो. याच संस्थेत त्याने पीडितेला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेर फिरायला जायचे. या सर्वांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT