Deenanath Hospital : दीनानाथ रुग्णालयाच्या अडचणीत वाढ; महापालिकेने दिला जप्तीचा इशारा

Tanishaa Bhise death case : पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रुग्णालयाने पैशाअभावी उपचार न केल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला रुग्णालयाच कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.
Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 09 Apr : पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू प्रकरण ताजे आहे. अशात या रुग्णालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. 8 वर्षांपासूनचा थकित कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेने रुग्णालयाला दिला आहे.

पुणे महापालिकेडून लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने मिळकतकर वसुलीसाठी नोटीस जारी केली गेली आहे. या नोटीसनुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख, 76 हजार रुपयांची थकबाकी भरणे आवश्यक आहे. दोन दिवसांत 22 कोटींची थकबाकी न भरसल्या पुढील कारवाई करण्याची नोटीसमध्ये नमूद आहे.

Deenanath Mangeshkar Hospital
Dharashiv scholarship exam : परीक्षा विभागाचे आयुक्त धक्का देणार! धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत सामुहिक कॉपी करणाऱ्या रॅकेटवर करणार कारवाई; शिक्षक संघटना आक्रमक

यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर कारवाई करण्याचे महापालिकाचे तोंडी आदेश आहेत. त्यामुळे आता नव्या प्रकरणात हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दीनानाथ रुग्णालयाने मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत हा कर भरण्यास असमर्थता दर्शवली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असल्याने रुग्णालयाचा मिळकत कर माफ करावा अशी मागणी करत रुग्णालयाने न्यायालयात केस दाखल केली आहे. 2017 पासून केस न्यायप्रविष्ठ आहे. याचाच उल्लेख काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर धनंजय केळकर यांनी देखील केला होता.

Deenanath Mangeshkar Hospital
NCP Politics : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना पाहिले अन् अजितदादा भडकले, नेमकं काय घडलं?

डिपॉझिट मागितल्याची रुग्णालयाची कबुली :

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा काही दिवसांपूर्वी प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. भिसे कुटुंबियांकडून हा मृत्यू दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मागितल्याचा आणि पाच तास उपचाराआभावी बसवून ठेवल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता.

याप्रकरणी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात रुग्णालय जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालयाच्या डॉ. केळकर यांनीही आमच्याकडे डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही. मात्र डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी 10 लाख रुपयांचं डिपॉझिट लेटवर नमूद केलं, असं म्हणत प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचं मान्य केलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com