Pune politics Sarkarnama
पुणे

Pune BJP : ज्याची भीती,तेच घडलं, पहिली यादी जाहीर होताच पुणे भाजपला पाठोपाठ दोन मोठे धक्के; 'या' नेत्यांनी घेतलं घड्याळ हाती

Pune BJP internal politics : भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी आता अंतिम करण्यात आली असून उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येत आहेत. अनेक दिवसांपासून भाजपची उमेदवारी मिळेल म्हणून आस लावून बसलेल्या नेत्यांच्या आशा मावळल्यानंतर हे उमेदवार अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच 'जिजाई' या बंगल्यावर रांगा लावू लागले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारांची यादी आता अंतिम करण्यात आली असून उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येत आहेत. अनेक दिवसांपासून भाजपची उमेदवारी मिळेल म्हणून आस लावून बसलेल्या नेत्यांच्या आशा मावळल्यानंतर हे उमेदवार अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच 'जिजाई' या बंगल्यावर रांगा लावू लागले आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) तिकीट मिळालं नसल्याने नाराज झालेल्या एका माजी नगरसेवकानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी जात पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जाधव हे प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या जाधव यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.

2012 च्या निवडणुकीमध्ये धनंजय जाधव हे भाजप पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. मात्र, 2017 च्या निवडणुकीमध्ये धनंजय जाधव यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणि पराभवानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये येत आपलं काम सुरू ठेवलं होतं.

मागील निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र यंदा तरी आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा धनंजय जाधव यांना होती. मात्र उमेदवारी मिळणार नाही याबाबत खात्री झाल्यानंतर सोमवारी (ता.29) त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणे भाजपाला दिवसातला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार हेही जाधव यांच्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. तेही अजितदादांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले आहेत.

यासोबतच आणखी दोन धक्के आज भाजपाला बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज जिजाई बंगल्यावर भाजपमधील नाराजांची रांग लागण्याची शक्यता असल्याचं वर्तवलं जात आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना धनंजय जाधव म्हणाले, गेले पंचवीस वर्षे मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भाजपकडून नगरसेवक म्हणून देखील निवडून आलो होतो. पक्षाचा निष्ठावंत म्हणून मी काम केलं. तरीही पक्षकार्यालयामध्ये सहभागी नाहीत अशांना उमेदवारी दिली जात आहे. निष्ठावंतांना डावल जात असल्याचा आरोप देखील धनंजय जाधव यांनी केला असून त्यामुळेच आपण पक्ष निर्णय घेतला असल्याचं जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT