Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

Sambhaji Bhide News : भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भिडे गुरुजींना मोठा झटका; नाराज 'शिवप्रतिष्ठान'ची तडकाफडकी मोठी घोषणा

Sangli Mahapalika Election: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. प्रचंड इनकमिंग सुरू असलेल्या भाजपसमोर उमेदवारीवरुन कोणाला संधी द्यायची याबाबत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. उमेदवारी डावलल्यानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांच्या नाराजीचा मोठा भडका उडाला आहे.
Published on

Sangli News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे त्यांच्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. ते कोणाचीही मुलाहिजा न राखता आपली भूमिका बेधडकपणे मांडताना दिसून येतात. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भिडे गुरुजींनी कायमच भाजपला साथ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जात असलेल्या संभाजी भिडे गुरुजींची (Sambhaji Bhide Guruji) मागणीच भाजपनं धुडकावून लावल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.युती,आघाडी,जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आली असून राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे.अशातच आता सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामातून मोठी अपडेट समोर आली आहे. सांगलीत संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी महापालिका निवडणुकीच्या तयारीत उतरण्याच्या तयारीत असून याबाबत भाजपकडे काही जागा सोडण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली होती. पण भाजपकडून भिडे गुरुजींची मागणीकडे कानाडोळा करण्यात आल्याचं चित्र आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. प्रचंड इनकमिंग सुरू असलेल्या भाजपसमोर उमेदवारीवरुन कोणाला संधी द्यायची याबाबत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. उमेदवारी डावलल्यानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांच्या नाराजीचा मोठा भडका उडाला आहे. या नाराजांनी आता थेट भाजपविरोधात बंडाचं निशाण फडकावत अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली महापालिका निवडणुकीसाठी धारकऱ्यांना सन्मानजनक जागांवर उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडे (BJP) सन्मानजनक जागांची मागणी केली होती. पण आता भाजपनं भिडे गुरुजीच्या शिवप्रतिष्ठानसाठी महापालिका निवडणुकीत केवळ एकाच जागेवर विचार केल्यानं निर्माण झाला

Sambhaji Bhide
Congress Strategy: ठाकरे बंधूंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव; ऐनवेळी शिवसेनेच्या जुन्या मित्रपक्षाशीच हातमिळवणी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना यंदा भाजपनं उमेदवारी नाकारल्याने संघर्षाची ठिणगी पडली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांसाठी भाजपकडे सन्मानजनक जागांची मागणी केली होती.मात्र,भाजपनं केवळ एकाच जागेवर धारकऱ्यांचा विचार केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे.

संभाजी भिडेंचं सांगलीसह महाराष्ट्राभर मोठी क्रेझ आहे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी भाजपच्या प्रचारातील हिंदुत्त्व,लव्ह जिहाद,गोरक्षा यांसह अनेक मुद्द्यांवर आक्रमकपणे काम करतात. परंतु भाजपाने समाधानकारक जागा दिल्या नसल्यामुळे संतापलेल्या धारकऱ्यांनी सांगली महापालिकेत अपक्ष निवडणुका लढवण्याची तयारी सूरु केली आहे.

Sambhaji Bhide
PMC Eelection 2025 : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सेट! काँग्रेसच मोठा भाऊ, पाहा कोणाला किती जागा?

आता भाजपकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवप्रतिष्ठानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यापुढील काळातही बोळज यांच्यानंतर आणखी काही धारकरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना उमेदवारी अर्ज दाखल केलेले बोळाज यांनी भाजपवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, आम्ही वर्षानुवर्षे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करत आहोत. मात्र, निवडणुकीच्या वेळी भाजपने आमची उपेक्षा केली. ज्यांना कोणी ओळखत नाही, अशा लोकांना तिकिटे त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत.संभाजी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com