BJP Pune Sarkarnama
पुणे

BJP Pune : पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? नाव ठरलं, मुहूर्त ठरला; आता फक्त घोषणा बाकी!

BJP Pune City President : भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहे. भाजपकडून टप्प्याटप्प्याने हे संघटनात्मक बदल करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया देखील घेण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 04 May : भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहे. भाजपकडून टप्प्याटप्प्याने हे संघटनात्मक बदल करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया देखील घेण्यात आली आहे. त्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्षांची नाव निश्चित करण्यात आली असून ती नावं जाहीर करण्याचा मुहूर्त देखील ठरला असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता फक्त नावांची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून राज्यातील 78 शहर आणि जिल्हा अध्यक्ष यांची नावे एकाच वेळी जाहीर करण्यात येणार आहेत. या शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपने परिवेक्षकांची नियुक्ती केली होती.

या परिवेक्षकांनी जिल्ह्यात आणि शहरात जाऊन त्या ठिकाणी मतदानचा अधिकार असलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शहराध्यक्ष पदासाठी तीन नाव सुचवण्यास सांगितली होती त्यामध्ये एक महिलेचं नाव असणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

पुणे शहराचा विचार केल्यास तब्बल 45 ते 50 पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष पदासाठी मतदान केल्याचं पाहायला मिळालं. शहराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी मतदानाचा अधिकार असलेल्या पदाधिकाऱ्यांना फोन, मेसेज आणि इतर माध्यमातून आपलं नाव शहराध्यक्ष पदासाठी पुढे करावी यासाठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं.

ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंद लिफाफ्यात ही नाव परिवेक्षकांनी वरिष्ठांकडं सुपूर्द केली होती. दरम्यान दोन दिवसापूर्वी वरिष्ठ पातळीवर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 78 शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली.

चर्चेअंती नाव देखील फायनल करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. 78 शहर आणि जिल्ह्यात कोण अध्यक्ष असणार याची निवड प्रक्रिया पक्षीय पातळीवर पूर्ण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच उद्या किंवा परवा या नावांची घोषणा जाहीररीत्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही नावे आघाडीवर

पुणे शहराध्यक्ष पदाचा विचार केलास सध्या अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर,गणेश घोष, राजेश पांडे यांची नावं आहे. महिलांन मध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर आरती कोंढरे , आणि वर्षा डहाळे यांची नावे रेसमध्ये आहेत . मात्र या नावांमध्ये गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

मात्र काही कार्यकर्ते वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्ष पदासाठी फायनल झाला असल्याचं सांगत असून याबाबत पैजा देखील लावताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात जाहीर होणाऱ्या आधी मध्ये गणेश बिडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? की सर्वांचे दावे फोल ठरवत भाजप कडून सप्राईज नाव शहराध्यक्ष पदासाठी जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT