Pradeep Garatkar, Harshavardhan Patil  Sarkarnama
पुणे

Pune News : विकास निधीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये जुंपली; श्रेयवादावरुन पत्रकबाजी

BJP Vs NCP: जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

संतोष आटोळे, इंदापूर :

Pune News: विकास कामांवरून इंदापुरात श्रेयवाद सुरू असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून प्रसिद्धीपत्रक काढून हे काम आपणच केल्याचा दावा केला आहे.

या विकासकामांवरुन भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गारटकर यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. इंदापूर शहरातील साठे नगर भागातील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

पाटलांचा हा दावा गारटकरांनी खोडून काढला आहे. साठे नगर भागासह शहरातील विविध विकास कामांसाठी विविध योजनेतून माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला आहे.

इंदापूर शहरातील लोकांच्या सातत्याने होत असल्याच्या मागणीचा विचार करून आमदार दत्तात्रय भरणे व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सर्व वार्डनिहाय स्वतः जाऊन प्रत्येक कामांची मागणी प्रमाणे पाहणी करूनच या कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले त्यानुसारच जिल्हा नियोजन समिती मध्ये कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचेही गारटकर म्हणाले.

इंदापूर शहरासाठी भाजप शिवसेना युती सरकारने नगर विकास विभागाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत 3 कोटीचा रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्याचे म्हटले आहे.

हा निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त करीत आगामी काळातील शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहराच्या विकासासाठी 15 कोटी 46 लाख 99 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT