Pune BJP Sarkarnama
पुणे

Pune BJP Protest : चंद्रकांत पाटलांवरील शाई हल्ल्याविरोधात, पुण्यात भाजपचं आक्रमक आंदोलन!

Pune BJP : मोर्चामध्ये भाजप कार्यकर्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन सामील झाले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील शाई हल्ला झाला. आता या हल्ल्यामुळे पुणे शहर भाजप आज आक्रमक झालेले दिसले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा प्रवृत्तीविरोधात, तसेच या हल्ल्याच्या मुख्य सुत्रधारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपतर्फे करण्यात आली. यावेळी मोर्चामध्ये भाजप कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन सामील झाले होते.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर यासह आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील यांनी औरंगाबादच्या पैठण येथील एका कार्यक्रमात महापुरुषांसंदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यारून वाद उफाळून आले होते. याचेच पडसाद चिंचवड उमटले होते. पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेध म्हणून एका व्यक्तिने त्यांच्या चेहऱ्यावर शाई हल्ला केला या घटनेनंतर भाजप अधिक आक्रमक झालेला दिसून येत आहे.

यावेळी भाजपाकडून विरोधीपक्षांच्या विरोधात घोषणा दिल्या. सोबतच कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांचा विजय असो, बाबसाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशाही घोषणा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, आंदोलनाची सांगता केली.

यावेळी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने हा शाई हल्ला केला. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दिलगिरी व्यक्त करुनही, त्यांच्यावर हल्ला घडवून आणणे संतापजनक आहे. सत्ता गमावल्याने विरोधीपक्षांचे नेते सैरभैर झाले आहेत. शांतता बिघडविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था विस्कळीत करून प्रश्न निर्माण करायचे, हा त्यांच्या सातत्याने प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT