Ambadas Danve : जनता इतर राज्यात जाण्याचा विचार करत असेल तर ही धोक्याची घंटा..

Shivsena : एकीकडे हिंदुस्थानचा ७५ वा स्वतंत्र दिन साजरा होताना हैद्राबाद प्रांत असणारा हा भाग दुर्लक्षित राहिला.
Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

Marathwada Sahitya Sammelan : वीज व पाण्याच्या सुविधेअभावी मराठवाड्यातील देगलूरचे लोक तेलंगणात जाण्यास उत्सुक आहेत. Shivsena येणाऱ्या काळात जर जनता इतर राज्यात जाण्याचा विचार करत असेल तर ती आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे `क्रियेवीना वाचाळता व्यर्थ` या समर्थ रामदासांच्या रचनेवर वाटचाल करत आपल्याला आधी यावर पावले उचलणे गरजेचे आहे.

Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Pankaja Munde : महापुरुषांच्या अवमानाचा निषेध म्हणून पंकजा मुंडे मौन पाळणार..

नुसते भाषण करून काहीही होणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजकारण्यांचेच कान टोचले. (Marathwada) ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रमुख वक्ते म्हणून दानवे बोलत होते. (Aurangabad) मराठवाड्यातील राजकीय चित्र दशा आणि दिशा या विषयावर बोलतांना दानवे यांनी आपली मते मांडली.

राजकीय परिस्थिती, शिक्षण, पाणी, कृषी विषयांवर भाष्य करतांना दानवे म्हणाले, शिक्षणाच्या बाबतीत १०१ वर्ष आपण मागे राहिलो असून त्यानंतर आपल्या मराठवाड्यात विद्यापीठ स्थापन झाले. त्यामुळे इतरांसोबत बरोबरी करण्यासाठी आपल्याला गती द्यावी लागेल.

मराठवाड्याचे भाग्य उजळवणारा जायकवाडी सारखा प्रकल्प जर कोणी आणला असेल तर तो तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने आणला गेला. त्यावेळच्या राजकीय परिस्थिती मध्ये जो काही विरोध त्यांना झाला, तो पत्करून मोठ्या जिद्दीने त्यांनी जायकवाडी प्रकल्प आपल्या मराठवाड्यात आणला.

त्यामुळेच आज मराठवाडा सुजलाम सुफलाम आहे. जे काही उद्योग आज घडीला चालत आहेत ती देखील जायकवाडीचीच देण आहे. मराठवाड्याला जे काही स्वरूप आजघडीला प्राप्त झाले आहे यामध्ये मराठवाड्यातील नेतृत्त्वाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिले नाव कै. शंकरराव चव्हाण यांचे घेतले पाहिजे. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले मात्र त्यांनी जे मराठवाड्यासाठी योगदान दिले आहे ते विसरता येणार नाही.

एकीकडे हिंदुस्थानचा ७५ वा स्वतंत्र दिन साजरा होताना हैद्राबाद प्रांत असणारा हा भाग दुर्लक्षित राहिला. उत्साहात स्वतंत्र दिन साजरा केला जातो मात्र मराठवाड्यात आता कुठे यावर उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. सरकार कोणतेही असो ते करेल ना करेल मराठवाड्याच्या जनतेला ते काम करणे गरजेचे आहे. यामुळे या मराठवाड्याला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाल दशा आणि दिशा मिळेल. ही सिद्धता आपल्याला करावी लागेल. `केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे` असे म्हणत दानवे यांनी आपल्या भाषणाचा समोरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com