Bopodi land fraud Sarkarnama
पुणे

Land Scam : आणखी एक सरकारी जमीन घोटाळा; तहसीलदारांसह 9 जण आरोपीच्या पिंजऱ्यात

Pune Bopodi Land Scam: FIR Filed Against Tehsildar and Others : तहसिलदार सुर्यकांत येवले यांनी 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 या कालावधीत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला.

अनिल सावळे

Illegal Ownership Claims on Government Agricultural Land : पुणे शहरात आणखी एक सरकारी जमीन परस्पर लाटल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या मालकीहक्क दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तहसिलदारासह नऊ जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नायब तहसिलदार प्रविणा बोर्डे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

तहसिलदार सुर्यकांत येवले, तसेच हेमंत गावंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ह्रषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विदयानंद अविनाश पुराणिक (इंदोर, मध्यप्रदेश), जयश्री संजय एकबोटे (मुंबई), शितल किसनचंद तेजवाणी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील (संचालक, अमेडिया एंटरप्रायझेस् एलएलपी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी प्रविणा बोर्डे या नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असून त्यांनी सरकारतर्फे प्राधिकृत अधिकारी म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, तहसिलदार सुर्यकांत येवले यांनी 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 या कालावधीत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. पुणे शहरातील बोपोडी गावातील एकूण 5 हेक्टर 35 आर इतक्या क्षेत्रफळाच्या शासकीय जमिनीचा अपहार करून ती खासगी व्यक्तींना दाखवण्यात आली.

ही जमीन 1883 पासून कृषी खात्याच्या मालकीची असून, शासनाच्या नावावर नोंद असतानाही येवले यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही त्या अधिनियमान्वये बेकायदेशीर कागदपत्रे तयार केली. तहसिलदार येवले यांनी हेमंत गावंडे (व्हिजन प्रॉपर्टी तर्फे) यांच्या माध्यमातून राजेंद्र विध्वंस, ह्रषीकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवाणी व दिग्विजय पाटील या सर्वांसोबत संगनमत करून शासकीय जमिनीवर खोटे मालकी हक्क दाखवणारे आदेश व पत्र तयार केले, असा आरोप फिर्यादींनी तक्रारीत केला आहे.

संपूर्ण व्यवहारामुळे शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत असून, आरोपींनी शासकीय संपत्तीवर अनधिकृत मालकीहक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय मालमत्ता खासगी व्यक्तींकडे वळवल्याचे हे प्रकरण असल्याने, या कारवाईकडे प्रशासन व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT